IN PICS : इतकी भारी डिमांड की हातचा गमावला सिनेमा, या स्टार्सना मानधनामुळे मिळालेला नकार By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 06:18 PM 2023-01-16T18:18:53+5:30 2023-01-16T18:26:58+5:30
Bollywood Stars Who Lost Movies Due to their high fee: बॉलिवूड स्टार्स त्यांच्या मानधनामुळे सतत चर्चेत असतात. पण अनेक स्टार्सनी केवळ मानधनाच्या रकमेमुळे सिनेमा हातचा गमावला. त्यावर एक नजर... श्रीदेवी आज या जगात नाही. त्या हयात असताना साऊथचा सुपरडुपर हिट बाहुबली हा सिनेमा त्यांना ऑफर झाला होता. शिवगामीच्या भूमिकेसाठी त्यांना विचारणा झाली होती. पण मीडिया रिपोर्टनुसार, श्रीदेवींनी या भूमिकेसाठी ६ कोटी मानधन मागितलं होतं आणि याचमुळे श्रीदेवींनी हा सिनेमा हातचा गमावला होता.
शाहरूख खानला म्हणे पद्मावत चित्रपटात एक महत्त्वपूर्ण रोल ऑफर झाला होता. पण शाहरूखने या रोलसाठी ९० कोटीची डिमांड केली. मग काय भन्साळींनी थेट त्याच्या नावावर फुली मारली.
अक्षय कुमारचं प्रकरण तर ताजं आहे. चर्चा खरी मानाल तर हेराफेरी ३ साठी अक्षय कुमारने म्हणे ९० कोटींची डिमांड केली. यानंतर काय तर अक्षय या सिनेमातून आऊट झाला.
करण जोहरने करिना कपूरला कल हो ना हो हा सिनेमा ऑफर केला होता. पण करिनाला तिच्या मनासारखं मानधन हवं होतं. ती तडजोड करायला तयार नव्हती. त्यामुळे करणने तिला घेण्याचा बेत रद्द केला आणि तिच्याजागी प्रीती झिंटाला घेऊन सिनेमा बनवला.
रणवीर सिंगचं नावही या यादीत आहे. रिपोर्टनुसार, बॉम्बे वेल्वेट हा सिनेमा रणवीरला ऑफर झाला होता. मात्र रणवीरने सिनेमासाठी तगड्या मानधनाची मागणी केली आणि पुढचं सगळं फिस्कटलं. ही भूमिका नंतर रणबीर कपूरच्या झाेळीत पडली.
नवाजुद्दीन सिद्दीकी हा जॉली एलएलबी २ या चित्रपटात झळकणार होता. पण या चित्रपटासाठी नवाजने म्हणे ३.५ कोटींची डिमांड केली. त्यामुळे त्याला या सिनेमात कास्ट करण्यात आलं नाही.
माधुरी दीक्षित लग्नानंतर बरीच वर्षे बॉलिवूडपासून दूर होती. ती बॉलिवूड वापसीची तयारी करत असताच, तिने कमबॅकसाठी ५ कोटींची डिमांड केली आणि निर्मात्यांनी तिच्याऐवजी दुसरी हिरोईनला घेणं पसंत केलं.
फन्ने खां या सिनेमासाठी साऊथ स्टार आर माधवन् मेकर्सची पहिली पसंत होता. मात्र माधवनने या चित्रपटासाठी इतकी मोठी रक्कम मागितली की निर्मात्यांनी त्याला घ्यायचा विचारच रद्द केला.
सोनाक्षी सिन्हा ही सुद्धा या यादीत आहे. सलमानच्या किक या चित्रपटासाठी तिने मागितलेलं मानधन इतकं जास्त होतं की अखेर सोनाला या सिनेमात न घेणंच निर्मात्यांना योग्य वाटलं.