Shama sikander was attempted to commit suicide because of depression and bipolar disorder
आजाराला कंटाळून या अभिनेत्रीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न, 5 वर्षानंतर परतली तेव्हा चेहऱ्यात झाला होता इतका बदल By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 01:37 PM2021-03-10T13:37:00+5:302021-03-10T13:36:30+5:30Join usJoin usNext शमा सिकंदरने टीव्हीपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘ये मेरी लाइफ है’ या मालिकेने ती प्रकाशझोतात आली. (Photo Instagram) टीव्हीवर काही मालिकांमध्ये झळकल्यावर ती अचानक गायब झाली. पण जेव्हा परतली, तेव्हा लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसेना. (Photo Instagram) काही वर्षांपूर्वी शमा बायपोलर डिसऑर्डर या मानसिक आजाराने ग्रस्त होती. याकाळात शमा डिप्रेशनमध्ये गेली होती. इतकी की, एकदा तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. (Photo Instagram) झोपेच्या गोळ्या खाऊन शमाने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला होता.मात्र आता शमा या डिप्रेशनमधून, आजारातून बाहेर पडली आहे. (Photo Instagram) शमा सिकंदर तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. पण काही वर्षांपूर्वी ती अशी नव्हतीच. , तिचे जुने फोटो पाहाल तर तुम्हालाही क्षणभर विश्वास बसणार नाही. (Photo Instagram) शमा सिंकदरने 'ये मेरी लाइफ है', 'सेवन' आणि 'बालवीर' या मालिकेत 'भयंकर परी'च्या व्यक्तिरेखेतून ती लोकप्रिय झाली होती. (Photo Instagram) 'प्रेम अगन', 'मन' 'अंश' 'धूम धडाका' या सिनेमांमध्येही ती झळकली होती. (Photo Instagram) विक्रम भट्टच्या ‘माया’ वेबसीरिजमध्ये शमाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता. तिच्या याच बोल्डनेसमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. (Photo Instagram) शमा गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. परंतु अजूनही तिला मोठा ब्रेक मिळालेला नाही. (Photo Instagram) सोशल मीडियार तिचे असंख्य फॉलोअर्स असून चाहत्यांच्या संपर्कात असते. (Photo Instagram) शमा सिकंदरला इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)Read in Englishटॅग्स :शमा सिंकदरShama Sikander