sharad kelkar reveals he used to bullied a lot in his childhood because of stammering problem
लहानपणी लोक चिडवायचे...! शरद केळकरनं इतक्या वर्षानंतर केला मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 01:11 PM2021-07-05T13:11:36+5:302021-07-05T13:22:07+5:30Join usJoin usNext Sharad Kelkar : बालपणीच्या कटू आठवणीमुळे शरद केळकर भावुक... मराठमोळा शरद केळकर (Sharad Kelkar) याला कोण ओळखत नाही? शरदने छोटा पडदा गाजवलाच पण बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. डिजिटल प्लॅटफॉर्मवरही त्याचा दबदबा आहेच. तानाजी आणि लक्ष्मी या सिनेमात शरद भाव खाऊन गेला. ओटीटीवरच्या ‘द फॅमिली मॅन 2’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेबसीरिजमध्ये त्यानं केलेल्या दमदार अभिनयाचंही कौतुक झालं. फार कमी लोकांना ठाऊक असेल की, शरद एक अभिनेताच नाही तर बॉलिवूडचा एक मोठा डबिंग आर्टिस्टही आहे. ‘बाहुबली 2’च्या हिंदी व्हर्जनमध्ये प्रभासनं साकारलेल्या अमरेंद्र बाहुबली या पात्राला शरदनंच आवाज दिला आहे. तूर्तास शरद एका वेगळ्या कारणानं चर्चेत आहे. होय, आयुष्याशी निगडीत एक मोठा खुलासा त्यानं केला आहे. आज शरद केळकर हा हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण बालपणी याच शरदची लोक मजा घ्यायचे. त्याची चेष्टा करायचे. त्याला चिडवायचे. होय, एका मुलाखतीत त्यानं खुद्द हा खुलासा केला. लहानपणी मी तोतरा होतो म्हणजे मला शब्दांचे स्पष्ट उच्चार करता येत नव्हते. त्यामुळे लहानपणी माझे मित्र , आजूबाजूचे लोक माझी खूप चेष्टा करायचे. पण आज बघा मी अशा क्षेत्रात काम करतोय जिथं माझ्या बोलण्याच्या कौशल्याला प्रचंड महत्त्व आहे, असं तो म्हणाला. तोतरा असल्यामुळे मी अभिनय करू शकेन असा विचार कधीच माझ्या मनात आला नव्हता. त्यामुळे मला खूप ठिकाणी अपयशाचा सामनाही करावा लागला. अनेक नकार मी पचवले. पण शेवटी ज्या मुक्कामाला जायचे, तिथं पोहोचलोचं, असंही तो म्हणाला. कदाचित नकारानेच मला मजबूत बनवलं. या नकारांनी मला माझ्यातील उणिवा सुधारायची ताकद मिळाली. दोन वर्षांत मी तोतरं बोलण्याच्या सवयीतून बाहेर पडलो आणि नीट बोलायला लागलो, असं तो म्हणाला. नकार किंवा अपयश हे चांगलं असतं असा माझा विश्वास आहे. अपयशामुळे तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही अधिक जोमाने प्रयत्न करता आणि त्याची ताकद तो नकारच तुम्हाला देत असतो, असंही त्यानं आवर्जुन सांगितलं.टॅग्स :शरद केळकरSharad Kelkar