Sharvari Wagh : "गेल्या ५ वर्षात मी दररोज नापास होत होते..."; अभिनेत्री शर्वरी वाघने केला रिजेक्शनचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:42 IST2025-04-16T15:31:13+5:302025-04-16T15:42:44+5:30
Sharvari Wagh : शर्वरीने एका मुलाखतीत तिच्या संघर्षांबद्दल सांगितलं. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात किती अडचणी आल्या याबाबत सांगितलं आहे.

अभिनेत्री शर्वरी वाघने अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. पण शर्वरीसाठी हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अत्यंत मेहनतीने तिने हे यश मिळवलं आहे.
शर्वरीने एका मुलाखतीत तिच्या संघर्षांबद्दल सांगितलं. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात किती अडचणी आल्या याबाबत सांगितलं आहे.
बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत आपल्या प्रवासाबद्दल बोलताना शर्वरी म्हणाली, "प्रत्येकाचा स्वतःचा संघर्ष असतो आणि अडचणी असतात."
"हो, मी हे सांगू इच्छिते की, मला ज्या प्रकारचं काम करायचं होतं ते शोधण्यात मला खूप अडचणी आल्या."
"मुंबईत घर असल्याने खूप मोठा फायदा झाला. या गोष्टीमुळे कायम संयम राखण्यात आला."
"मला एक चांगला प्रोजेक्ट मिळेपर्यंत मी वाट पाहू शकत होते. हा एक मोठा विशेषाधिकार आहे."
"गेल्या ५ वर्षात माझ्यासाठी सर्वात कठीण गोष्ट म्हणजे मी दररोज ऑडिशनसाठी जायचे आणि मला चित्रपट, जाहिरातींमध्ये रिजेक्शन मिळायचं."
"मला असं वाटत होतं की, मी दररोज परीक्षेत नापास होत आहे. पण तरीही प्रत्येक ऑडिशनमध्ये मी स्वतःला सांगायचे की, हा माझा चित्रपट आहे" असं शर्वरीने म्हटलं आहे."
सार्वजनिक ठिकाणी आपल्या संघर्षांबद्दल जास्त का बोलत नाही याचं कारण शर्वरीने सांगितलं आहे.
"माझ्या आईने मला मी असताना शाळेत काहीतरी सांगितलं होतं, जे अजूनही माझ्यासोबत आहे."
"आई म्हणाली होती- स्वतःला कधीही विक्टिम बनू देऊ नका. याचा चित्रपट इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही, पण तरीही आईचा हा सल्ला मनात घर करून राहिला आहे" असं अभिनेत्रीने म्हटलं.
शर्वरी वाघ सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत.