'काटा लगा गर्ल' शेफाली जरिवालाचे पतीसोबत रोमॅंटिक Photo, नेटकऱ्यांनी केली उर्फीशी तुलना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 01:42 PM2023-02-15T13:42:25+5:302023-02-15T13:54:56+5:30

विचित्र कपडे म्हणलं की आजकाल उर्फी जावेदच आठवते. पण आता 'काटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाचीही उर्फी सोबत तुलना होत आहे.

'व्हॅलेंटाईन डे' निमित्त काटा लगा गर्ल अभिनेत्री शेफाली जरीवाला हिने पतीसोबतचे काही रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शेफाली नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करत असते. कधी हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडतात तर अनेकदा ती ट्रोलही होते.

विचित्र कपडे म्हणलं की आजकाल उर्फी जावेदच डोळ्यासमोर येते. मात्र आता इतर अभिनेत्रींचे फोटो बघून त्यांची तुलना उर्फीशी केली जाते.

शेफालीने नुकत्याच पोस्ट केलेल्या या फोटोतील तिची फॅशन बघून नेटकऱ्यांनी तिची तुलना उर्फी जावेदशी केली आहे. उर्फी कडून प्रेरणा घेतली का अशा कमेंट्स तिला या फोटोंवर आल्या आहेत.

२००२ मध्ये ‘कॉंटा लगा’ या गाण्याने शेफाली जरीवाला लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर पोहोचली. होती सध्या तिचे सोशल मीडियावरील बोल्ड अॅंड ब्युटिफुल फोटो पाहून अनेकांना विश्वास बसत नाही.

शेफाली अभिनयापासून लांब आहे मात्र तरी तिची चर्चा अधूनमधून सुरुच असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी जोडली गेली आहे.

शेफालीचं वय ४० वर्षे आहे मात्र तिच्या फोटोंकडे बघून तिच्या वयाचा अंदाजही लागत नाही. बिकीनी असो किंवा स्कर्ट ती प्रत्येक लुकमध्ये फिट दिसते.

शेफालीने तिचा पती 'पराग त्यागी' सोबतही फोटो पोस्ट केले आहेत. पराग आणि शेफालीने २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली. या कपलचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.