'लागीर झालं जी' मालिकेतील अज्याची शीतली रिअलमध्ये दिसते तितकीच सुंदर, पाहा तिचे स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 13:42 IST2021-03-04T13:24:14+5:302021-03-04T13:42:33+5:30

अभिनेत्री शिवानी बावकर हिने 'लागीर झालं जी' मोठ्या खुबीने शीतली ही भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयामुळेच गुडलक देणारी शीतल रसिकांच्या काळजात घर करुन गेली. आजही शीतलीला चाहते विसरले नाहीत.

मालिकेमधून बाहेर पडताच तिने लूकवर मेहनत घेत स्वतःचा मेकओव्हर केला. मेकओव्हरमुळे शिवानी कामालिची सुंदर दिसत आहे.

छोट्या पडद्यावर गावरान अंदाजात दिसणारी शीतली म्हणजेच शिवानी बावकर रिअल लाईफमध्येच स्टायलिश आहे.

रिअल लाइफमध्ये शीतली तितकीच ग्लॅमरस आहे. या प्रत्येक फोटोमधील शीतलीची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे.

या सगळ्या फोटोंमध्ये शीतलीचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.

असे एक नाही तर बरेच फोटो इन्स्टाग्रामवर शीतलीने शेअर केलेत. तिचा हा ग्लॅमरस अंदाज रसिकांनाही तितकाच भावतो आहे.

काही दिवसांपूर्वीच तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यामुळे शीतलीचा हे फोटो काहीसे वेगळे ठरत आहेत.