shraddha kapoor family photo PSC
पाहा श्रद्धा कपूरच्या फॅमिलीचे फोटो, आई आहे तिच्याइतकीच सुंदर By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 07:19 PM2020-03-03T19:19:22+5:302020-03-03T19:35:52+5:30Join usJoin usNext शक्ती कपूरच्या पावलावर पाऊल ठेवून त्याची मुलगी श्रद्धा कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि खूपच कमी वेळात एक अभिनेत्री, गायिका, गीतकार आणि डिझायनर म्हणून स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली. शक्ती कपूरने प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेच्या बहिणीसोबत लग्न केले असून त्याच्या पत्नीचे नाव शिवांगी कपूर आहे. शक्तीची पत्नी दिसायला अतिशय सुंदर आहे. श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरने देखील काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवांगी यांनी किस्मत या चित्रपटात शक्ती कपूर यांच्यासोबत काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. शिवांगी या अगदी त्यांची बहीण पद्मिनी कोल्हापूरे यांच्यासारख्याच दिसतात. त्यांचे अनेक फोटो आपल्याला श्रद्धा आणि शक्ती यांच्या इन्स्टाग्रामला पाहायला मिळतात. श्रद्धाच्या 'आशिकी 2', 'एक व्हिलन', 'एबीसीडी 2', 'बागी', 'रॉक ऑन 2' 'स्त्री' अशा विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत.टॅग्स :श्रद्धा कपूरशक्ती कपूरShraddha KapoorShakti Kapoor