श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट, मोहक रुपाने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 14:48 IST2024-08-27T14:37:37+5:302024-08-27T14:48:03+5:30

भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यंदा 26 ऑगस्ट 2024 रोजी जन्माष्टमी साजरी झाली.

'आनंदी गोपाळ' (Anandi Gopal) फेम अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद (Bhagyashree Milind) हिने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त (Shree Krishna Janmashtami 2024) खास फोटोशूट केलं आहे.

भाग्यश्रीने हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

राधाच्या मनमोहक रुपात भाग्यश्रीने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

मोरपंखी रंगसंगतीच्या लेहेंग्यामध्ये भाग्यश्रीचं सौंदर्य खुललं आहे.

"प्रेम बरखा जो बरसे.. कोई ऐसे क्यूं तरसे , राधिके.. तोहे कैसे मै ये समझाऊ.. क्यूं मै ऐसे डर जाऊ.. सांवरे , राधिके – जावेद अख़्तर" असे कॅप्शन भाग्यश्रीने या फोटोंना दिले आहे.

भाग्यश्रीने सुंदर पोज दिल्या आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या भाग्यश्रीच्या हातात मोरपंख दिसत आहे.

अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट करत तिच्या सौंदर्यांचे कौतुक केले.

या लेटेस्ट फोटोशूटवर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे.

केसांची सुंदर हेअरस्टाईल करत भाग्यश्रीने फुलं माळली आहेत.