आरस्पानी सौंदर्यासह आपल्या हटके स्टाईलसाठी ऐश प्रसिद्ध आहे. ऐशच्या फॅशन आणि स्टाईलचा जलवा फक्त बॉलीवुड पार्ट्या, इव्हेंट्स आणि केवळ भारतात पाहायला मिळतो असं नाही. सातासमुद्रापार विविध फेस्टिव्हलमध्येही ऐशने आपल्या हटके फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट्ने हॉलीवुडच्या मंडळींची आणि जगभरातील रसिकांची मने जिंकली आहेत.