सिद्धार्थ जाधवची पत्नीदेखील आहे प्रचंड ग्लॅमरस; कलाविश्वापासून दूर असूनही जगते लक्झरी लाइफस्टाइल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 08:00 AM2022-02-04T08:00:00+5:302022-02-04T08:00:00+5:30

Siddharth jadhav: एकेकाळी तृप्तीदेखील एकांकिकांमध्ये अभिनय करायची. परंतु, कालांतराने तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला.

आपल्या उत्तम अभिनयासह अतरंगी स्टाइलसाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव.

मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेल्या सिद्धार्थचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.

कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सिद्धार्थच्या कुटुंबाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. त्यामुळेच आज सिद्धार्थच्या पत्नीविषयी जाणून घेऊयात.

सिद्धार्थच्या पत्नीचं नाव तृप्ती असं असून तीदेखील उत्तम अभिनेत्री असल्याचं म्हटलं जातं.

एकेकाळी तृप्तीदेखील एकांकिकांमध्ये अभिनय करायची. परंतु, कालांतराने तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला.

कलाविश्वात सक्रीय नसलेली तृप्ती सोशल मीडियावर मात्र सक्रीय असून तिचे ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

तृप्ती आणि सिद्धार्थ 'नच बलिए 8' या रिअॅलिटी शोमध्येही झळकले होते. या शोनंतर तिची लोकप्रियता वाढली.