फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 04:31 PM2024-11-18T16:31:50+5:302024-11-18T16:37:35+5:30

Adnan Sami : गायक अदनान सामी त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे खूप चर्चेत असतो. त्याने १३० किलो वजन कमी केले आहे.

गायक अदनान सामीची गाणी चाहत्यांना खूप आवडतात. आपल्या सुरेल आवाजाने त्याने चाहत्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले होते. त्याच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त, गायक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे.

अदनान त्याच्या वजन कमी करण्याच्या प्रवासामुळे चर्चेत आला. एक काळ असा होता जेव्हा त्याचे वजन २३० किलो होते. २००६ मध्ये त्याने सांगितले होते की, डॉक्टरांनी त्याला चेतावणी दिली होती की, जर वजन कमी केले नाही तर त्यांच्याकडे फक्त ६ महिने शिल्लक आहेत.

ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी बोलताना त्याने सांगितले की, २००६ मध्ये डॉक्टरांनी मला चेतावणी दिली होती की माझ्या वाढलेल्या वजनामुळे माझे जगण्यासाठी फक्त ६ महिने उरले आहेत. माझे वजन २३० किलो होते.

त्याने पुढे सांगितले की, तुम्ही याबाबत काहीही केले नाही तर तुमचा उद्धार होणार नाही, असे डॉक्टर म्हणाले. करो या मरो अशी परिस्थिती होती. लोकांना आश्चर्य वाटले की माझे इतके वजन अचानक कसे कमी झाले.

तो पुढे म्हणाला की, अनेकांनी माझ्यावरील आशा सोडली होती. मी हे करू शकत नाही असे त्यांना वाटले. मी त्यांना दोष देऊ शकत नाही. हे माझ्यासाठी खूप अवघड काम होतं.

एकेकाळी हे अशक्य वाटत होते. मग मी एका न्यूट्रिशनिस्टला भेटलो. त्याने मला समजावले. आम्ही हळू हळू सुरुवात केली. मला माहित नव्हते की मी इतके वजन कमी करू शकतो, असे अदनानने सांगितले.

२०२२ मध्ये टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना अदनान म्हणाला होता की, मी हाय प्रोटीन डाएट घ्यायचो. मी भात, भाकरी, साखर, तेल खाल्ले नाही. माझे १३० किलो वजन कमी झाले. मी हे नियोजन केले नव्हते पण ते घडले.

आज मी माझ्या खाण्याच्या सवयींबद्दल खूप सावध आहे. मी जास्त खात नाही. मी लहान भागांमध्ये खातो, असे अदनानने सांगितले.