'बजरंगी भाईजान'मधली 'मुन्नी' आठवतेय? सध्या सोशल मीडियावर रंगलीये तिच्याच फोटोशूटची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 12:35 AM2024-12-04T00:35:59+5:302024-12-04T00:47:43+5:30

Bajrangi Bhaijan Munni Latest Photos : मुन्नी फेम हर्षाली मल्होत्राने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेत लेटेस्ट फोटो

२०१५ साली प्रदर्शित झालेला सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' सिनेमा प्रचंड गाजला. पाकिस्तानातून चुकून भारतात आलेल्या चिमुरड्या मुन्नीची ती गोष्ट होती.

या सिनेमात मुन्नी हे पात्र साकारलेली बालकलाकार हर्षाली मल्होत्रा तेव्हा तिच्या निरागसतेने लोकप्रिय झाली होती. 'बजरंगी भाईजान'मुळे हर्षाली प्रसिद्धीझोतात आली होती. आता मात्र मुन्नी मोठी झाली आहे.

याच वर्षी मे महिन्यात हर्षालीचा दहावीचा निकाल लागला. त्या परीक्षेत तिने ८३ टक्के गुण मिळवून १०वी पास केली. या यशासोबतच तिने ट्रोलर्सही तोंडं बंद केली.

मुन्नीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली हर्षाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिच्या इन्स्टाग्रामवर तिने काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील या फोटोत हर्षालीच्या चेहऱ्यावरचे हावभाव अतिशय सालस आणि निरागस आहेत. हर्षालीच्या याच लोभसवाण्या निरागसतेमुळे चाहते तिच्यावर भरभरून प्रेम करताना दिसतात.