कुणी म्हणतंय महाराणी, तर कुणी सुंदरी...साजिरी..!; सायली संजीवच्या राजेशाही लूकला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 06:00 AM2023-02-04T06:00:00+5:302023-02-04T06:00:00+5:30

Sayali Sanjeev : सायली संजीवने नुकतेच रॉयल लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअऱ केले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे सायली संजीव

सायली संजीवने काहे दिया परदेस या मालिकेतून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या मालिकेतून ती घराघरात पोहचली.

सायली संजीवने मालिकेनंतर रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. शेवटची ती गोष्ट एका पैठणीची चित्रपटात झळकली होती.

सायली तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

सायलीने नाकात नथ, दागिने आणि गजरा अशा लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

सायली संजीवच्या या मराठमोळ्या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

सायली संजीवच्या या फोटोशूटवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.

या फोटोशूटवर एका युजरने कमेंट केली की, महाराणी, तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, साजिरी. तर बऱ्याच चाहत्यांनी या लूकमध्ये सुंदर दिसत असल्याचे म्हटले आहे.

सुयश टिळक, अभिज्ञा भावे आणि क्षिती जोग या कलाकारांनी सायलीच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.

सायलीच्या या मराठमोळ्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.