सलमान खान आणि सोमी अली यांच्यात नेमकं काय बिनसलं होतं? का झालं होतं त्यांचं ब्रेकअप? By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 02:04 PM 2022-03-30T14:04:54+5:30 2022-03-30T14:24:16+5:30
somy Ali And Salman Khan Breakup : मला सलमानबद्दल काहीही तक्रार नाही. आता आम्ही आपआपल्या आयुष्यात बरंच पुढे निघून गेलो आहोत, असं काय काय सोमी बोलली होती. आज याच सोमीने अप्रत्यक्षपणे सलमानचा पर्दाफाश करण्याची धमकी दिली. सलमान खानच्या फिल्मी करिअरची जितकी चर्चा झाली नाही,तितकी त्याच्या लव्ह लाईफची झाली. होय, सोमी अली ही सलमानची अशीच एक गर्लफ्रेन्ड. दोघंही कधीकाळी प्रेमात होते. पण कालांतरानं दोघांचं ब्रेकअप झालं.
सोमी मुळची पाकिस्तानची. सोमीला सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये इंटरेस्ट होता. पण ती बॉलिवूडमध्ये येण्याचं सर्वात मोठं कारण होतं सलमान खान. होय, सलमानवर लहानपणापासूनच सोमीचा क्रश होता.
‘मैंने प्यार किया’ पाहिला आणि तेव्हापासून सलमानसोबतचं लग्न करायचं, असं तिनं ठरवलं होतं. सोमीचा कल बघून तिच्या आईनं तिला मुंबईला पाठवलं. पण सोमीला बॉलिवूडपेक्षाही सलमानमध्ये इंटरेस्ट होता. सलमानचा पिच्छा करत करतचं ती फ्लोरिडावरून मुंबईत पोहोचली होती. यावेळी ती केवळ 16 वर्षांची होती.
मुंबईत आल्या आल्या तिने मॉडेलिंग सुरू केलं आणि मग बॉलिवूडमध्ये संधी शोधत राहिली. संधी मिळाली आणि पाठोपाठ सलमानला भेटण्याची इच्छाही पूर्ण झाली. एकदिवस ती सलमानला भेटलीच. मग दोघंही प्रेमात पडले.
सलमान व सोमी एकदोन नाही तर 8 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. असं म्हणतात की, एकदा सलमानने रागात सोमीच्या डोक्यावर काचेची बॉटल फोडली होती़.अर्थात सोमीने हे वृत्त नाकारलं होतं. ‘मी पहिल्यांदा ड्रिंक केल्यानं सलमान नाराज झाला होता आणि म्हणून त्याने टेबलावर बॉटल आदळली होती, असं तिनं सांगितलं होतं.
1999 मध्ये अचानक सोमी व सलमानचं ब्रेकअप झालं. याचं कारण होते, ऐश्वर्या राय. या ब्रेकअपनंतर सोमीनं बॉलिवूड सोडलं आणि यानंतर ती पुन्हा कधीच बॉलिवूडमध्ये दिसली नाही.
गेल्यावर्षी एका मुलाखतीत सोमी सलमानबद्दल बोलली होती. मला सलमानबद्दल काहीही तक्रार नाही. त्याने मला धोका दिला आणि मी त्याला सोडून निघून गेले. आता आम्ही आपआपल्या आयुष्यात बरंच पुढे निघून गेलो आहोत, असं काय काय सोमी बोलली होती.
आज याच सोमीने अप्रत्यक्षपणे सलमानचा पर्दाफाश करण्याची धमकी दिली. ‘बॉलिवूडच्या हार्वी विन्स्टीन, एक दिवस तुझाही पर्दाफाश होईल. ज्या महिलांचं तू शोषण केलंस, त्या एकदिवस समोर येतील आणि सत्य जगाला सांगतील. जसं ऐश्वर्या रायने केलं...’, अशी पोस्ट सलमानचं नाव न घेता तिनं शेअर केली.
सोमीच्या या पोस्टची सध्या चांगलीच चर्चेत आहे. यात सोमीनं ऐश्वर्याचाही उल्लेख केल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सलमानने कथितरित्या ऐश्वर्याला मारहाण केली होती. कदाचित सोमी सुद्धा यातून गेलीये. पण असं असेल तर आत्तापर्यंत ती गप्प का राहिली?
सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमी आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी फ्लोरिडाला परतली. येथे तिने सायकॉलॉजीचं शिक्षण घेतलं. यानंतर मियामी युनिव्हर्सिटीतून जर्नलिझम केलं. 2006 मध्ये तिने महिलांच्या अधिकारांसाठी काम सुरू केलं व नो मोअर टीअर्स नावाची संस्था उघडली.
वयाच्या पाचव्या वर्षी सोमीवर लैंगिक अत्याचार झाला होता. हेच ही संस्था सुरू करण्यामागचं खरं कारण होतं. आता सोमी जगभरातील महिलांच्या अधिकारांसाठी काम करते. सोमीच्या या संस्थेचे हजारो सदस्य आहेत. 42 वर्षांची सोमी कदाचित आजही सलमानला विसरू शकलेली नाही. अजूनही ती विवाहित आहे.