असा मस्त दणक्यात साजरा झाला सोनाली कुलकर्णीचा पहिला दिवाळसण..., पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 12:05 PM2021-11-06T12:05:15+5:302021-11-06T12:11:01+5:30

Sonalee Kulkarni : सोनाली याचवर्षी दुबईत लग्नबंधनात अडकली.लग्नानंतरचा पहिला दिवाळसण मात्र तिनं तिच्या पतीसोबत पुण्यात साजरा केला.

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी यंदाच कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत लग्नबंधनात अडकली. लग्नानंतरचा पहिला दिवाळसण मात्र दोघांनीही पुण्यात साजरा केला.(सर्व फोटो- सोनालीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून)

पहिल्या दिवाळसणाचा उत्साह न्याराच असतो. सोनालीचा पहिला दिवाळसण दणक्यात साजरा झाला.

दिवाळीच्या दिवशी लाल-केशरी साडी,मोकळे केस, हातावर मेहंदी असा तिचा थाट होता. नवºयासोबत सोनालीने अनेक रोमॅन्टिक पोज दिल्यात.

पाडव्याच्या दिवशीही सोनाली मस्तपैकी सजरी. नृत्यकला, चित्रकला आणि आकाशी रंगाची साडी अशा सर्व आवडत्या गोष्टींचा मेळ जमून आला.

आकाशी रंगाच्या साडीत सोनाली प्रचंड सुंदर दिसत होती. त्यामुळे पाडवाही दणक्यात साजरा झाला.

पाडव्याच्या दिवशी सोनाली व तिचा पती कुणाल दोघेही मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसले.

सोनालीने भाऊबीजही थाटात साजरी केली. भाऊ अतुल कुलकर्णीसोबत तिनं मस्तपैकी पोज दिल्यात.

भाऊबीजेच्या दिवशीही तिचा थाट बघण्यासारखा होता. गुलाबी साडी, नाकात नथ असा तिचा लुक होता. एकंदर काय तर पहिल्या दिवाळसणाला सोनालीने धम्माल मज्जामस्ती केली.