sonalee kulkarni do you know actress first love and breakup
सोनालीने कुणालपूर्वी केलंय 'या' व्यक्तीला डेट; ५ वर्षांचं रिलेशन तोडत संपवलं नातं By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 11:33 AM2023-05-18T11:33:54+5:302023-05-18T11:36:50+5:30Join usJoin usNext Sonalee kulkarni: सोनालीने स्वत: या मुलाला प्रपोज केलं होतं. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. आज सोनाली महाराष्ट्राची अप्सरा या नावानेही ओळखली जाते. पुण्याजवळ असलेल्या खडकी येथे सोनाली लहानाची मोठी झाली. मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या सोनालीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायम चर्चा रंगत असते. सध्या सोशल मीडियावर सोनालीच्या एक्स बॉयफ्रेंडची चर्चा रंगली आहे. सोनालीने दुबईस्थित कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केलं आहे. मात्र, त्यापूर्वी ती एका व्यक्तीच्या प्रेमात होती. कॉलेजमध्ये असताना सोनाली एका सिनिअरच्या प्रेमात पडली होती. विशेष म्हणजे या मुलाला सोनालीने स्वत: प्रपोज केलं होतं. जवळपास ५ वर्ष सोनालीने या मुलाला डेट केलं. मात्र, पुढे परस्पर सामंजस्याने त्यांनी ब्रेकअप केला आणि त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. सोनालीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. त्यानंतर पहिल्यांदा केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमातून तिने मराठी सिनेविश्वात पदार्पण केलं. सोनालीने आजवर 'नटरंग', 'अजिंठा', 'क्षणभर विश्रांती', 'हंपी', पांडू अशा कित्येक सिनेमांमध्ये काम केलं आहे.टॅग्स :सोनाली कुलकर्णीसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजनsonalee kulkarniCelebritycinemaTelevision