PHOTOS : सोनाली कुलकर्णीनं मेहंदी सोहळ्यात घातला जुना लेहंगा, खास आहे कारण By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 04:56 PM 2022-08-14T16:56:11+5:30 2022-08-14T17:02:53+5:30
Sonalee Kulkarni : होय, मेहंदीच्या दिवशी सोनालीनं कलरफुल घागरा घातला होता. तिच्या या घागऱ्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सोनालीनं लग्नातील सगळे कपडे खास डिझाइन करुन घेतले होते. पण मेहंदीचा लेहंगा मात्र जुना होता. किती जुना तर 12-13 वर्षे जुना... महाराष्ट्राची अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लंडनमध्ये पती कुणालसोबत दुसऱ्यांदा विधिवत लग्न केलं. या वेडिंग वेडिंग स्टोरी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे.
यानंतर सोनालीने मेहंदी, हळद व लग्नाचे अनेक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हे फोटो दृष्ट लागावी इतके सुंदर आहेत. यातील मेहंदीचे फोटो सर्वाधिक खास आहे.
होय, मेहंदीच्या दिवशी सोनालीनं कलरफुल घागरा घातला होता. तिच्या या घागऱ्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण या घागऱ्याचं वैशिष्ट्य कदाचित तुम्हाला ठाऊक नसणार.
सोनालीनं लग्नातील सगळे कपडे खास डिझाइन करुन घेतले होते. पण मेहंदीचा लेहंगा मात्र जुना होता. होय, किती जुना तर 12-13 वर्षे जुना.
या घागऱ्याशी तिच्या काही भावना जुळलेल्या आहेत. कारण हा लेहंगा म्हणजे सोनालीनं तिच्या आयुष्यात पहिल्यांदा घेतलेली सर्वांत महाग वस्तू होती.
12-13 वर्षांपूर्वी सोनालीचं मोठं नाव झालं. बऱ्यापैकी पैसे कमावले. तेव्हा स्वत:साठी काहीतरी महागडी वस्तू खरेदी करण्याचं तिने ठरवलं. तेव्हा तिनं हा महागातला घागरा चोली स्वत:ला गिफ्ट होता.
हा घागरा चोली खरेदी केला तेव्हाच, तो मी माझ्या मेहंदीच्या दिवशी घालणार, हे तिनं ठरवलं होतं. लंडनमध्ये पार पडलेल्या शाही लग्नसोहळ्यात मेहंदीच्या दिवशी सोनालीने ठरवलं तेच केलं.
होय, हा हिरवाकंच लहेंगा तिनं मेहंदी सोहळ्यात घातला. गमंत अशी की 12-13 वर्षांनीही सोनालीला तो तिला अगदी फिट्ट बसला. इतक्या वर्षांनी अगदी अर्ध्या इंचानीही त्याचं मेजरमेंट बदलाव लागलं नाही. तशीच्या तशी सोनाली त्यात फिट झाली.
सोनाली व कुणालने कोरोना काळात दुबईत पहिल्यांदा लग्नगाठ बांधली होती. पण महामारीमुळे या लग्नाला सोनाली व कुणालचे कुटुंबीय सुद्धा हजर नव्हते. नोंदणी पद्धतीने हा विवाह झाला होता.
सोनालीला लग्नाची हौसमौज करायची होती. विधीवत लग्न करायचं होतं. त्यामुळे तिने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचं निमित्त साधत पुन्हा विधीवत लग्न करण्याचा निर्णय घेतला. लंडनमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. हा लग्नसोहळा प्लॅनेट मराठी ओटीटीवर तीन भागांत दाखवला गेला.