अंगापेक्षा बोंगा मोठा! हटके फॅशन पुरती फसली, ट्रोल झाली सोनम कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 01:11 PM2024-04-05T13:11:12+5:302024-04-05T13:15:01+5:30

सोनम कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'सावरिया' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

त्यानंतर 'रांजना', 'प्रेम रतन धन पायो', 'खूबसुरत', 'नीरजा', 'वीरे दी वेडिंग' अशा अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं.

सोनम सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती तिचे फोटोही शेअर करत असते.

नुकतेच सोनमने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने काळ्या रंगाचा पोलका डॉट ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे.

पण, तिची ही फॅशन प्रेक्षकांना रुचलेली नाही. हटके फॅशनच्या नादात नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

"हा काय ड्रेस घातला आहे", "खांद्याला हँगर लावला आहे का?", "मी तुझा चाहता आहे, पण, हा ड्रेस बिग नो" अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

तर काहींनी "फ्रिज बॉक्स वाटतोय", "एकच प्रश्न का?", "हा फॅशनेबल ड्रेस असू शकतो, पण चांगला दिसत नाही", असं म्हणत सोनमला ट्रोल केलं आहे.

सोनमचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. पण, चाहत्यांना तिचा लूक अजिबात आवडलेला नाही.