डीप-नेक ड्रेसमध्ये सोनम कपूरचे फोटशूट, फोटो पाहून चाहतेही झाले आवाक् By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 12:42 PM 2021-06-02T12:42:22+5:30 2021-06-02T12:53:36+5:30
बॉलीवुडची मस्सकली सोनम कपूर आपली फॅशन, स्टाईल याबाबत सोनम कपूर बरीच सजग असते. कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची ती विशेष खबरदारी घेते. बॉलीवुडचे इव्हेंट्स, पार्ट्या आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये तिच्या स्टायलिश अंदाजामुळेच उपस्थितांच्या नजरा तिच्यावरच खिळतात.
नेहमीच आपल्या स्टाइलमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री सोनम कपूरसुद्धा स्टाइल दिवा म्हणून सोनमनं वेगळीच ओळख निर्माण केलीय.
कधी डेनिम साडी, कधी विविधरंगी वन-पीस आणि आकर्षक ड्रेस यामुळे सोनमच्या फॅशन सेन्सची कायमच चर्चा असते.
सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.
नुकतेच तिने खास फोटोशूटही केले आहे. यांत अतिशय वेगळा अंदाजात तिची ड्रेसिंग स्टाइल असल्याचे पाहायला मिळतंय.
फोटोत तिने खास डीप नेक ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
अनेकदा फॅशन एक्सप्रिमेंट करताना सोनम दिसते.
बऱ्याचदा सोनमची हटके फॅशन आणि स्टाइल चर्चेचा विषय बनते.
अनेकदा तिच्या कपड्यांवरून तिची खिल्लीही उडवली जाते.
मात्र सोनमला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. तिला जे आवडतं तेच ती परिधान करते.