प्रेमासाठी धर्म बदलला, विवाहित अभिनेत्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिली अभिनेत्री; तरीही झालं ब्रेकअप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:12 IST2025-03-11T17:02:00+5:302025-03-11T17:12:54+5:30
अभिनेत्रीवर 'घर तोडणारी' असा आरोपही झाला होता. तर अभिनेत्याची पत्नी दोघांविरोधात कोर्टात गेली होती.

फिल्म इंडस्ट्रीत कधी कोणाचं लग्न होईल आणि कधी कोणाचा घटस्फोट होईल सांगता येत नाही. कलाकार विवाहित अभिनेता/ अभिनेत्रींच्याही प्रेमात पडल्याची उदाहरणं झाली आहेत.
अशीच एक साऊथची सुपरस्टार अभिनेत्री प्रभूदेवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. प्रभूदेवा तेव्हा विवाहित होता आणि त्याला मुलंही होती. प्रभूदेवाचंही तिच्यावर जीवापाड प्रेम होतं आणि तो बायकोला घटस्फोट देण्याच्या तयारित होता. कोण आहे ती अभिनेत्री?
ही आहे लेडी सुपरस्टार नयनतारा (Nayanthara). नयनतारा १९८४ साली बंगळुरुमध्ये जन्माला आली. तिचं खरं नाव डायना मरियम कुरियन आहे. शिक्षण घेतल्यानंतर तिने मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला. नंतर काही कास्टिंग डायरेक्टर्सने तिला सिनेमांची ऑफर दिली.
नयनताराचा पहिला सिनेमा 'मनसिनक्कारे' बॉक्सऑफिसवर सुपरहिट झाला होता. नंतर तिने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. मात्र सोबतच ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती.
२००८-०९ च्या काळात नयनतारा आणि प्रभूदेवा यांच्या डेटिंगच्या चर्चा होत्या. या चर्चांमुळे खळबळ माजली होती कारण प्रभूदेवा विवाहित आणि दोन मुलांचा बाप होता.
१९९५ साली प्रभूदेवाचं रामलतासोबत लग्न झालं होतं. त्याला तीन मुलं आहेत. नयनतारासाठी प्रभूदेवा रामलताला घटस्फोट देणार होता. मात्र रामलता यासाठी तयार नव्हती. दोघांचं प्रकरण कोर्टातही गेलं.
या प्रकरणानंतर नयनताराला 'घर तोडणारी'म्हणत जबाबदार ठरवण्यात आलं. २ जुलै २०१० रोजी प्रभूदेवाचा घटस्फोट झाला. तर दुसरीकडे प्रभूदेवा नयनतारासोबत लिव्ह इन मध्ये राहत होता. इतकं सगळं करुनही नंतर प्रभू देवा आणि नयनताराचंही ब्रेकअप झालं.
नयनताराच जन्म ख्रिश्चन कुटुंबातला आहे. २०११ साली तिने हिंदू धर्म स्वीकारला. प्रभूदेवासाठीच तिने धर्म बदलल्याची चर्चा होती.