So Pretty! पिवळ्या फ्लोरल साडीत अभिनेत्रीचं खुललं सौंदर्य; वयाच्या चाळीशीतही दिसते लाजवाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 16:37 IST2024-06-05T16:29:02+5:302024-06-05T16:37:30+5:30
दक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे काजल अग्रवाल.

काजलने हिंदी, तमिळ तसेच तेलुगू फिल्म इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
२००४ मध्ये आलेल्या 'क्यू हो गया' या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीला पाहिजे तसा स्टारडम मिळाला नाही.
२०१० मध्ये आलेल्या 'सिंघम' या चित्रपटामध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. अभिनेता अजय देवगनसोबत काजलने पहिल्यांदा स्क्रिन शेअर केली होती.
या चित्रपटानेही त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पाहायला गेल्यास काजलचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
काजल सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. त्याद्वारे वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत काजल नेहमीच तिच्याबाबतीत महत्वाचे अपडेट्स चाहत्यांना देत असते.
अलिकडेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोटो पोस्ट केलेत.
पिवळ्या रंगाची फ्लोरल साडी परिधान करून तिने हे फोटोशूट केलंय. तसेच या लूकला साजेसे रत्नजडित दागिने तिने घातले आहेत. अभिनेत्री या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसतेय.
काजलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्रीने उद्योगपती गौतम किचलू यांच्यासोबत लग्न केलं. तिला एक गोंडस मुलगा देखील आहे, ज्याचं नाव नील आहे.