Actress Amala paul married her boyfriend jagat desai in kochi
पहिलं लग्न तीन वर्षात मोडलं आता अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 09:31 AM2023-11-06T09:31:22+5:302023-11-06T10:21:02+5:30Join usJoin usNext अभिनेत्रीचं पहिलं लग्न केवळ ३ वर्षे टिकलं होतं. साऊथ सिनेसृष्टीतील एका पाठोपाठ एक सेलेब्स लग्नगाठ बांधत आहेत. अलीकडेच दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता वरुण तेजने त्याची गर्लफ्रेंड लावण्या त्रिपाठीसोबत इटलीत लग्न केले. त्यानंतर साऊथमधील आणखी एका अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप लग्न केलं आहे. आता या कपलने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन ही माहिती दिली. साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉलने अलिकडेच तिच्या वाढदिवशी बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर १० दिवसांनी दोघांनी गुपचूप लग्नगाठ बांधली. अमाला पॉल आणि जगत देसाईने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सरप्राईज दिलं. अभिनेत्रीने तिच्या लग्नाला पर्पल कलरचा वेस्टर्न लेहेंगा परिधान केला होता. तर जगत देसाई पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसले. अमाला पॉल ही अभिनेत्री मुळची केरळची.२००९ साली 'नीलथामरा' या सिनेमात तिने सहकलाकाराची भुमिका केली होती. या सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अमला पॉलने 2014 मध्ये फिल्ममेकर एएल विजयसोबत लग्न केलं. केएल विजयच्या कुटुंबीयांना अमाला पॉलचं सिनेमात काम करणं आवडलं नाही. यावर अमला पॉलने एएल विजयपासून घटस्फोट घेतला. अमला पॉलने 2017 मध्ये पती एएल विजय याच्याशी घटस्फोट घेतला. त्यांचे लग्न केवळ तीन वर्षे टिकले. अमालाने तेलगु इंडस्ट्रीत अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. तिने चार तेलगु सिनेमांमध्ये काम केले आहे ज्यात 'नागा चैतन्य', 'राम चरण' आणि 'अल्लु अर्जुन' यांच्यासोबत तिने स्क्रीन शेअर केली आहे. भोला चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे.टॅग्स :अमला पॉलAmala Paul