नागा-शोभितानंतर आता साउथच्या या अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 14:53 IST2024-12-12T14:50:38+5:302024-12-12T14:53:52+5:30
साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे.

साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेश आज विवाहबंधनात अडकली आहे.
कीर्ती सुरेशने लॉंग टाइम बॉयफ्रेंड अँथनी थैटिलसोबत १२ डिसेंबर रोजी सातफेरे घेतले आहेत. कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थित तिने लग्न केले.
गोव्यात हा विवाहसोहळा पार पडला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोत कीर्ती खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहे.
कीर्ती सुरेशचा नवरा अँथनी थैटिल दुबईतील बिझनेसमन आहे. तो एस्परोस विंडो सोल्यूशन्सचा मालक आहे. तो कोच्चीला वास्तव्यास आहे.
कीर्ती सुरेश आणि अँथनी थैटिल एकमेकांना गेल्या १५ वर्षे डेट करत आहेत. कीर्ती अँथनीला भेटली होती तेव्हा ती शाळेत होती आणि अँथनी त्यावेळी कॉलेजमध्ये शिकत होता.
त्यावेळी त्या दोघांची भेट झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता त्या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे.
कीर्ती सुरेशच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर कल्कीनंतर आता ती लवकरच बेबी जॉन सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत वरूण धवन मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार आहे.