विजय देवरकोंडापेक्षा किती लहान आहे रश्मिका? आधी १३ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत केलेला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 01:44 PM2024-11-25T13:44:35+5:302024-11-25T13:53:12+5:30

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा या बहुचर्चित कपलमधलं अंतर माहितीये का?

'नॅशनल क्रश','श्रीवल्ली' अशा नावांनी चर्चेत असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) 'पुष्पा २' मध्ये दिसणार आहे. सध्या रश्मिका साऊथ तसंच हिंदीतही सक्रीय आहे.

रश्मिकाचं प्रोफेशनल आयुष्य जोरात सुरु असतानाच वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा आहे. अभिनेता विजय देवरकोंडाला ती डेट करत आहे. पण विजय तिच्यापेक्षा नक्की किती मोठा आहे माहितीये का?

रश्मिकाचा जन्म ५ एप्रिल १९९६ रोजी झाला. याचा अर्थ ती २८ वर्षांची आहे. तर विजय देवरकोंडा १९८९ सालचा आहे. म्हणजेच तो ३५ वर्षांचा आहे. रश्मिका विजयपेक्षा तब्बल ७ वर्षांनी लहान आहे.

काही दिवसांपूर्वीच विजयने एका मुलाखतीत रिरलेशनशिपवर भाष्य केलं. 'मी ३५ वर्षांचा आहे, मग सिंगल असेन असं वाटतं का?' असं तो म्हणाला. त्याच्या या वक्तव्यामुळे रश्मिकासोबचं त्याचं नाव अप्रत्यक्षपणे कन्फर्मच झालं.

पण तुम्हाला माहितीये का रश्मिका मंदाना काही वर्षांपूर्वी १३ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. इतकंच नाही तर तिने साखरपुडाही केला होता.

काही वर्षांपूर्वी रश्मिका अभिनेता रक्षित शेट्टीसोबत (Rakshit Shetty) रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनी २०१७ मध्ये साखरपुडाही केला. तेव्हा रश्मिका फक्त २१ वर्षांची होती तर रक्षित ३४ वर्षांचा होता.

मात्र नंतर कंपॅटिबिलिटी इश्यूजमुळे त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि साखरपुडा मोडला. मात्र आजही त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

२०१६ साली आलेल्या 'किरिक पार्टी' सिनेमात रक्षित आणि आणि रश्मिकाने एकत्र काम केलं होतं. हा रश्मिकाचा पहिलाच सिनेमा होता. सिनेमाच्या सेटवर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. २०१८ साली त्यांच्या नात्याचा शेवट झाला.