फहाद फासिल आणि साई पल्लवीचा 'हा' थ्रिलर चित्रपट OTTवर प्रदर्शित, क्लायमॅक्स हादरवणारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 16:07 IST2025-04-06T15:44:22+5:302025-04-06T16:07:42+5:30
साई पल्लवीसारखी दर्जेदार अभिनेत्री आणि फहाद फासिलसारखा अष्टपैलू अभिनेता एकत्र आल्यावर काय होतं, हे सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला कळेलचं.

दाक्षिणात्य सिनेविश्वात विविधांगी अभिनयाची छाप सोडणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे फहाद फासिल (Fahadh Faasil).
'पुष्पा' आणि 'पुष्पा २: द रूल' या चित्रपटात 'भंवर सिंह शेखावत' या धाकड भुमिकेनंतर फहाद फासिलची प्रचंड क्रेझ भारतात निर्माण झाली.
फहाद फासिलने त्याच्या कित्येक सिनेमामध्ये दर्जेदार काम केलंय. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.
विशेष म्हणजे फहादसोबत या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आहे.
२०१९ थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटाचं नाव 'अथिरन' (Athiran) असं आहे. ओटीटीवर येताच हा चित्रपट खूप लोकांनी पाहिला आहे.
'अथिरन' हा डिज्नी प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे. सध्या तो ट्रेंड करतोय.
भूतकाळातल्या घटनांमध्ये अडकलेल्या आणि उपचारासाठी एका रुग्णालयात डांबून ठेवलेल्या नित्याच्या सुटकेचा मनोरंजक थरार या चित्रपटात पाहायला मिळतो.
साई पल्लवीसारखी दर्जेदार अभिनेत्री आणि फहाद फासिलसारखा अष्टपैलू अभिनेता एकत्र आल्यावर काय होतं, हे सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला कळेलचं.