फायर लगी 'पुष्पा' की 'श्रीवल्ली'! जांभळ्या साडीत रश्मिका मंदाना दिसली झक्कास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 06:18 PM2024-12-04T18:18:03+5:302024-12-04T18:31:34+5:30

Rashmika Mandanna: जांभळ्या रंगाच्या साडीतील रश्मिकाच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केले आहे.

सध्या सर्वत्र पुष्पा २ची चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटातील पुष्पाराजसोबत श्रीवल्लीही चर्चेत आहे.

श्रीवल्लीची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने साकारली आहे.

पुष्पा २ चित्रपटाची रिलीज डेट जशी जवळ येत आहे, तशी लोकांची उत्सुकता वाढताना दिसत आहे.

सध्या अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानादेखील पुष्पा २ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत.

चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये दोघेही फॅशनेबल अंदाजात दिसत आहेत. रश्मिका असेही नेहमीच आपल्या फॅशन स्टेटमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. नुकतेच रश्मिकाने जांभळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.

रश्मिकाची ही साडी संपूर्ण प्लेन आहे त्याला सीक्वेन्सची बॉर्डर देऊन स्टायलिश टच देण्यात आला आहे.

विशेष बाब म्हणजे रश्मिका या साडीच्या माध्यमातून चित्रपटाचे प्रमोशनदेखील करत आहे. तिच्या या साडीच्या पदरावर पुष्पा आणि श्रीवल्ली लिहिण्यात आले आहे.

रश्मिकाने साडीवर हलका मेकअप केला असून कानात इअररिंग्स, हातात ब्रेसलेट आणि रिंग परिधान केलीय. रश्मिकाचा हा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे.