sreeleela : इंटरनेट सेन्सेशन श्रीलीलाने सर्वांना लावलंय वेड, फोटो सोशल मीडियावर चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 03:53 PM2024-07-04T15:53:35+5:302024-07-04T16:00:39+5:30

बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे श्रीलीला. इंटरनेट सेन्सेशन बनलेली श्रीलीला कायम चर्चेत असते.

नुकतंच श्रीलीलानं तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या काही सिझलिंग लूकमधील हॉट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये, श्रीलीला हिनं व्हाईट शर्ट आणि ब्लॅक स्कर्ट परिधान केलेला दिसत आहे.

या लूकसाठी अभिनेत्रीनं बोल्ड मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये श्रीलीला खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. श्रीलीला तिच्या सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असते. कोणतीही फॅशन ती बिनधास्तपणे कॅरी करते.

श्रीलीला हिला 'ब्युटी विथ ब्रेन'चे उत्तम उदाहरण आहे. एकीकडे ती सुंदर लूकने लाखो प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवते. तर दुसरीकडे वैद्यकीय शास्त्राचे शिक्षण घेत आहे.

देसी असो वा वेस्टर्न लूकमध्ये ती सुंदरच दिसते. आपल्या प्रत्येक लूकमधून चाहत्यांना घायळ करण्याची कला तिच्याकडे आहे.

श्रीलीलाचं नाव दक्षिण सिनेमा जगतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झालं आहे.

श्रीलीला ही एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहे आणि तिने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्याचा सराव सुरू केला होता.

सुपरस्टार महेश बाबूसोबत गुंटूर कारम सिनेमातील तिच्या गाण्यानं सर्वांना वेड लावलं होतं.