'महाराजा' आवडला? मग विजय सेतुपतीचे हे ७ सिनेमे ओटीटीवर बघाच! तुम्हाला नक्की आवडतील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 04:31 PM2024-07-25T16:31:51+5:302024-07-25T16:47:52+5:30

विजय सेतुपतीच्या 'महाराजा' सिनेमाने सध्या सगळीकडे धुमाकूळ घातलाय. 'महाराजा' सारखेच विजय सेतुपतीचे हे ८ सिनेमे नक्की बघा (maharaja, vijay setupati)

विजय सेतुपतीचा महाराजा सिनेमा सध्या गाजतोय. हा सिनेमा तुम्ही नेटफ्लिक्सवर हिंदीसह तामिळ, तेलगू भाषेत बघू शकता

विजय सेतुपतीचा आणखी एक गाजलेेला सिनेमा म्हणजे विक्रम. या सिनेमात कमल हासन, फहाद फजिल या कलाकरांचीही मुख्य भूमिका होती. हा सिनेमा हॉटस्टारवर उपलब्ध आहे

विजय सेतुपती आणि आर.माधवन यांच्या अभिनयाची जुगलबंदी असलेला विक्रम वेधा सिनेमा यूट्यूबवर हिंदीमध्ये उपलब्ध आहे

विजय सेतुपतीच्या सुधू कावुय्यम सिनेमात एका किडनॅपरची कहाणी दाखवली आहे. हा सिनेमा झी ५ वर पाहू शका

विजय सेतुपतीचा एक अजरामवर रोमँटिक सिनेमा म्हणजे ९६. हा सिनेमाही तुम्हाला युट्यूबवर पाहता येईल

विजय सेतुपतीची वेगळीच भूमिका असलेला सुपर डिलक्स सिनेमाही खूप लोकप्रिय ठरला. या सिनेमात विजयसोबत समंथा, फहाद फाजिल हे कलाकार दिसून येतात

शाहरुख खान - विजय सेतुपतीचा जवान सिनेमा हा २०२३ मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे

विजय सेतुपती-कतरिना कैफ यांची वेगळीच केमिस्ट्री असणारा रहस्यमयी मेरी ख्रिसमस सिनेमा. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.