malyalam actress mahalaxmi menon who won national award at the age of 17 and commit suicide
१७ व्या वर्षी मिळाला नॅशनल अवॉर्ड, अन् केली आत्महत्या; २६ वर्ष मोठ्या दिग्दर्शिकाची होती पत्नी By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 11:42 AM2024-01-13T11:42:19+5:302024-01-13T12:01:46+5:30Join usJoin usNext अभिनेत्रीच्या पतीवरच हत्येचा आरोप मनोरंजनसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांना कमी वयात मोठं यश मिळालं मात्र कमी वयात त्यांचा रहस्यमय शेवटही झाला. मधुबाला, दिव्या भारती, स्मिता पाटील ही अशीच काही उदाहरणं. अनेकांच्या मृत्यूचं रहस्य तर अद्याप उलगडलेलं नाही. अशीच एक कहाणी आहे मल्याळम अभिनेत्री महालक्ष्मी मेननची (Mahalaxmi Menon). तिला शोभा या नावाने ओळख मिळाली होती. भारतीय सिनेसृष्टीला लाभलेल्या सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक म्हणजे शोभा. मद्रास येथे मल्याळम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांनी तमिळ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करत करिअरला सुरुवात केली होती. 1966 साली आलेल्या 'थट्टंगल थिराव्कप्पडुम' सिनेमात त्यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली. तर 1978 मध्ये मल्याळम फिल्म 'उथरादा रात्री'मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांनी सुरुवात केली. शोभा यांनी 1979 साली तमिळ सिनेमा केला होता ज्याचं नाव होतं पासी. या सिनेमातील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना वयाच्या केवळ 17 व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यासोबतच त्यांनी २ केरळ स्टेट अवॉर्डही पटकावले. शोभा यांना कन्नड आणि तमिळ सिनेसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून दक्षिण फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले. इतक्या प्रतिभावान अभिनेत्रीने 1980 साली वयाच्या 17 व्या वर्षीच आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं गूढ आजपर्यंत सुटलेलं नाही. 1983 साली आलेल्या श्रीदेवी आणि कमल हसन यांच्या 'सदमा' सिनेमाचे दिग्दर्शक होते बाळू महेंद्र. ते शोभा यांच्यापेक्षा २६ वर्षांनी मोठे होते. अभिनेत्री शोभा त्यांच्या प्रेमात पडल्या. कुटुंबाच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न केले. तेव्हा शोभा यांचं वय फक्त १६ वर्षं होतं. मात्र लग्नानंतर असे काय झाले की शोभा यांनी गळफास घेत आत्महत्या केली याचं कोडं आजपर्यंत सुटलेलं नाही. शोभा यांचे पती बाळू महेंद्र यांच्यावरच पत्नीच्या हत्येचा आरोप होता. 1983 साली आलेला मल्याळम सिनेमा 'लेखायुदे मरनम ओरु फ्लॅशबॅक' शोभा यांच्यावर जीवनावर आधारित होता. शोभा यांचं असं एक्झिट सर्वांनाच चटका लावून गेलं. टॅग्स :सेलिब्रिटीमृत्यूTollywoodCelebrityDeathTollywood