PHOTO: सोनेरी रंगाची साडी अन् भरजरी दागिने; शोभिता धुलिपालाच्या वेडिंग लूकची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 03:30 PM2024-12-09T15:30:35+5:302024-12-09T15:36:46+5:30

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाबद्दल सध्या मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा होताना दिसते.

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाबद्दल सध्या मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा होताना दिसते.

४ डिसेंबर २०२४ या दिवशी दोघेही लग्नबंधनात अडकले. कुटुंबीयांच्या आशीर्वादाने त्यांनी नव्या आयुष्याला सुरूवात केली.

हैदराबाद येथील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये हा विवाहसोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला.

दरम्यान,अजूनही चाहत्यांमध्ये त्यांच्या लग्नाची चर्चा आहे. अशातच नुकतेच शोभिताने इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे ब्राइडल लूकमधील खास फोटो पोस्ट केले आहेत.

सोनेरी रंगाची कांजीवरम साडी त्यावर भरजरी दागिने अशा दाक्षिणात्य लूकमध्ये अभिनेत्री तयार झाली होती.

शोभिता नववधूच्या रुपात कमालीची सुंदर दिसत आहे.

लग्नातील प्रत्येक विधी तिने पारंपरिक पद्धतीने केला. त्यामुळे शोभिताचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं.

शोभिताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे.