Nora Fatehi in traditional look wearing yellow saree bts from movie matka
Photos: लिंबू कलरची साडी अन् लांब वेणी; 'बोल्ड' नोराचा पारंपरिक लूक, दिसतेय खूपच सुंदर By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 03:54 PM2024-11-17T15:54:42+5:302024-11-17T16:15:39+5:30Join usJoin usNext नोराच्या अदांवर चाहते फिदा! नेहमीच हॉट अँड बोल्ड लूकमध्ये दिसणारी डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) वेगळ्याच अंदाजात समोर आली आहे. एका सिनेमातील तिचा मनमोहक लूक व्हायरल होत आहे. नोरा आतापर्यंत सिनेमांमध्ये बेली डान्स करताना दिसली. प्रत्येक सिनेमात तिचा बोल्ड अवतारच पाहायला मिळाला. मात्र आता तिचा पूर्ण नवीन लूक समोर आला आहे. अगदी साधी लिंबू कलरची साडी, लांब वेणी, कपाळावर टिकली आणि साजेसे दागिने अशा सुंदर लूकमध्ये नोरा सर्वांसमोर आली आहे. तिच्या या श्रृंगारावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. या फोटोंमध्ये नोराच्या हावभावानेही लक्ष वेधून घेतलं आहे. थोडी बावरलेली, घाबरलेली पण सौंदर्याने नटलेली असा तिचा एकंदर लूक आहे. तिच्या या पारंपरिक पेहरावाने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. नोराचा 'मटका' हा तेलुगू सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. याच सिनेमातील सेटवरचे काही क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तेव्हाचाच तिचा हा सुंदर लूक आहे. नोराच्या या अप्रतिम सौंदर्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'सुंदर', 'परफेक्ट इंडियन लूक', 'मिस युनिव्हर्स' अशा कमेंट्स तिच्या या फोटोंवर आल्या आहेत. नोरा मूळची कॅनडाची आहे. मात्र आपण मनाने भारतीय असल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. 'रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ती उत्तम बेली डान्सर आहे. अनेक सिनेमांमध्ये तिने आयटम नंबर केले आहेत. नोराने 'स्ट्रीट डान्सर','क्रिश ४','मडगाव एक्सप्रेस','बाहुबली' या सिनेमांमध्ये तिने भूमिका साकारली आहे.टॅग्स :नोरा फतेहीTollywoodसोशल मीडियाव्हायरल फोटोज्Nora fatehiTollywoodSocial MediaViral Photos