१४ वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती नॅशनल क्रश रश्मिका मंदाना, साखरपुड्यानंतर नातं तुटलं अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 12:59 PM 2023-09-29T12:59:16+5:30 2023-09-29T13:09:39+5:30
आपल्यापेक्षा १४ वर्षांनी मोठ्या असलेल्या रक्षित शेट्टीच्या प्रेमात ती पडली. दोघांनी लगेच लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि झटपट साखरपुडा उरकून घेतला आणि काही दिवसांतच.. रश्मिका मंदाना सध्या तिच्या अॅनिमल सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. १ डिसेंबरल हा सिनेमा रिलीज होणार आहे. यात ती रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. रश्मिका मंदना नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते.
रश्मिकाने 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'किरिक पार्टी' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. तेव्हा ती फक्त १९ वर्षांची होती. पहिल्याच सिनेमाच्या सेटवर रश्मिकाचं प्रेम बहरलं. रश्मिका आपल्या को-स्टारच्या प्रेमात पडली.
आपल्यापेक्षा १४ वर्षांनी मोठ्या असलेल्या रक्षित शेट्टीच्या प्रेमात ती पडली. दोघांनी लगेच लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि झटपट साखरपुडा उरकून घेतला.
रश्मिकाने तर रक्षितचे तिच्या कुटुंबात स्वागत केले होते. रश्मिकाने तिच्या इंस्टाग्रामवर रक्षितचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये रक्षित तिच्या वडिलांसोबत उभा होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये रश्मिकाने लिहिले होते की, कुटुंबात तुझं स्वागत आहे.
काही दिवसानंतर दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. हे नातं लग्नापर्यंत पोहोचण्याआधी त्यांचा साखरपुडा मोडला.
दोघांनीही एकमेकांपासून अंतर ठेवायला सुरुवात केली आणि आपआपल्या मार्गाने पुढे निघून गेले. काही चित्रपटांनंतर रश्मिका मंदान्ना बॉलिवूडमध्येही स्टार बनली. रक्षित शेट्टीही कन्नड इंडस्ट्रीत त्याच्या चित्रपटांमध्ये व्यस्त झाला.
साखरपुडा मोडल्यानंतरही रक्षित आणि रश्मिका आजही एकमेकांच्या संपर्कात आहेत.अलीकडेच रक्षित शेट्टीनेही आपल्या एका मुलाखतीत रश्मिकाच्या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.
रक्षित शेट्टीनंतर रश्मिकाचे नाव साऊथ सुपरस्टार देवरकोंडासोबत जोडले जाऊ लागले. मात्र, रश्मिका आणि विजय दोघेही याबाबत काहीच बोलले नाहीत.
साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या रश्मिकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर एकाहून एक हिट चित्रपट केले आहेत. एका चित्रपटासाठी ती ३ ते ४ कोटी रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.