PHOTOS: कपाळावर चंद्रकोर अन् केसात माळला गजरा, रश्मिका मंदानाचं गुलाबी सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:09 IST2025-02-25T19:03:15+5:302025-02-25T19:09:22+5:30

रश्मिका मंदानाचा लुक लक्षवेधी ठरत आहे.

'नॅशनल क्रश' असलेल्या अभिनेत्री रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) प्रथमच ऐतिहासिक चित्रपटात काम केले आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित 'छावा' चित्रपटात तिनं महाराणी येसूबाईंची भूमिका (Maharani Yesubai in chhaava movie) साकारली आहे.

महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतून तिनं अनोखी छाप पाडली आहे. दाक्षिणात्य असूनही तिनं मराठमोळी भुमिका उत्तम पद्धतीने निभावली.

आपल्या अभिनयाने तिने लगेचच प्रेक्षकांना आपलसं करून घेतलं.

नुकतंच रश्मिका मंदानाने गुलाबी ड्रेसमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कपाळावर चंद्रकोर लावलेली रश्मिका सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.

रश्मिकाचं हे साधं, मात्र तितकंच सोज्वळ फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

चाहत्यांना रश्मिकाचे फोटो खूपच आवडले असून त्यांनी या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.