'ही' अभिनेत्री आहे बॉक्स ऑफिस क्वीन, दोन वर्षात कमावले ३३०० कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 18:46 IST2025-03-26T18:31:17+5:302025-03-26T18:46:17+5:30
दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी ही अभिनेत्री सध्या बॉलिवूडमध्ये राज्य करताना दिसते.

एक अभिनेत्री सध्या प्रचंड चर्चेत आहे. ही सुंदरी बॉक्स ऑफिसची क्वीन म्हणून आता ओळखली जात आहे. २०२४ आणि २०२५ या दोन्ही वर्षात तिने एकानंतर एक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.
या अभिनेत्रीनं बॉलिवूड, टॉलिवूड असं दोन्हीकडे नाव गाजवलं आहे. तुम्ही ओळखलं का? ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नाही तर रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)आहे.
रश्मिका मंदाना हिला चित्रपटसृष्टीत पदार्पण करून फक्त ९ वर्षे झाली आहेत. एवढ्या काळात तिनं जगभरात चाहतावर्ग निर्माण केला आहे.
प्रियंका चोप्रा हॉलिवूडमध्ये गेल्यानंतर दीपिका पादुकोण ही बॉक्स ऑफिसची क्वीन बनली होती. तिच्यानंतर आलिया भटने हा मुकुट आपल्या डोक्यावर चढवला. पण, आता रश्मिकानं आलिया आणि दीपिकालाही मागे टाकले आहे.
'किरिक पार्टी'मधून पदार्पण करणाऱ्या रश्मिकाने 'अंजनी पुत्र', 'चमक' आणि 'चलो' सारखे चित्रपट केले. पण, 'गीता गोविंदम'द्वारे तिला ओळख मिळाली आणि 'पुष्पा' सिनेमानं स्टार बनवलं.
गेल्या दोन वर्षांत 'अॅनिमल', 'पुष्पा २' आणि आता 'छावा' या चित्रपटांनी सर्वाधिक कमाई केली. या चित्रपटांमधील समान गोष्ट म्हणजे या तिन्ही सिनेमांमध्ये रश्मिका ही अभिनेत्री होती. एबीपीच्या रिपोर्टनुसार, या तिन्ही चित्रपटांनी जगभरात ३३०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता तिनं थेट बॉलिवूडचा 'दबंग खान' सलमानसोबत स्क्रीन शेअर केली आहे.
रश्मिका मंदान्नाकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. 'सिकंदर'नंतर ती आयुष्मान खुरानासोबत 'थामा'मध्ये दिसणार आहे.
रश्मिका मंदान्नाच्या लव्हलाईफबद्दल बोलायचं झालं तर ती 'हँडसम हंक' विजय देवरकोंडा याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहे.
कधी दोघं मालदीव व्हॅकेशनला जातात तर कधी डिनर डेटवर असतात. दोघंही वेगवेगळे फोटो पोस्ट करतात मात्र चाहते ते एकत्र असल्याचं शोधून काढतात. दोघे लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे.