कशी झाली डायना मरियमची नयनतारा?; कुटुंबाच्या विरोधात जाऊन अभिनेत्रीने स्वीकारला हिंदू धर्म

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 08:02 AM2023-09-08T08:02:47+5:302023-09-08T08:08:50+5:30

Nayanthara: नयनतारा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानचा जवान हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री नयनतारा स्क्रीन शेअर करत आहे.

जवानच्या निमित्ताने साऊथ ब्युटी नयनतारा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून अल्पावधीत ती बी टाऊनमध्येही लोकप्रिय झाली.

उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्यामुळे कायम चर्चेत येणारी नयनतारा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत आहे.

सध्या नेटकऱ्यांमध्ये नयनताराच्या खऱ्या नावाची आणि तिच्या धर्माविषयी चर्चा रंगली आहे. नयनताराने ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्माचा स्वीकार केल्याचं म्हटलं जात आहे.

नयनताराच्या आई-वडिलांचा विरोध असतानाही तिने धर्म परिवर्तन केलं.

नयनताराचं खरं नाव डायना मरियम असं असून तिचा जन्म एका ख्रिश्चन कुटुंबात झाला होता. परंतु, तिने सिनेसृष्टीत आल्यावर तिचं नाव बदललं.

मीडिया रिपोर्टनुसार, २०११ मध्ये नयनताराने चेन्नईतील आर्य समाजातील मंदिरात हिंदू धर्माचा स्वीकार केला. धर्म बदलल्यानंतर तिने तिचं नाव डायना कुरियन सोडून नयनतारा हे नवीन ठेवलं.

नयनताराच्या धर्मपरिवर्तनाविषयी सोशल मीडियावर कायम चर्चा रंगते. इतकंच नाही तर तिच्याकडे हिंदू धर्मात परिवर्तन केल्याचं प्रमाणपत्र असल्याचंही म्हटलं जातं. परंतु, तिने याविषयी कधीच भाष्य केल नाही.

२०२२ मध्ये नयनताराने दिग्दर्शक विग्नेश शिवनसह लग्न केलं. २०१५ पासून ही जोडी एकमेकांना डेट करत होती. त्यानंतर सरोगसी पद्धतीने तिने जुळ्या मुलांना जन्म दिला.

नयनताराने तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या सिनेमांमध्ये काम केलं आहे. नयनतारा सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. ती एका सिनेमासाठी ११ कोटी रुपये घेते.