जुळ्या मुलांची 'संतूर मॉम', एका सिनेमासाठी घेते 10 कोटी; अभिनेत्रीचं लेकासोबत Photoshoot

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 01:14 PM2024-05-31T13:14:41+5:302024-05-31T13:40:33+5:30

अभिनेत्री मोजक्याच सिनेमांमध्ये दिसते पण तिचे लाखो चाहते आहेत.

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) 'जवान' सिनेमामुळे चर्चेत आली. शाहरुख खानसोबत तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. या सिनेमानंतर तिने इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केलं. आता ती इन्स्टाग्रामवर नवरा आणि तिच्या क्युट जुळ्या मुलांचे फोटो पोस्ट करत असते.

नयनतारा सध्या कुटुंबासोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे. पती विग्नेशसोबत तिने बरेच फोटो शेअर केलेत. कपलचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नयनताराला दोन जुळी मुलं आहेत. 2022 मध्ये तिने विग्नेश सिवनसोबत लग्नगाठ बांधली. यानंतर सरोगसीद्वारे ती दोन मुलांची आई झाली. इन्स्टाग्रामवर आल्यानंतर तिने पहिल्यांदा मुलांची झलक दाखवली होती.

सध्या नयनतारा पती आणि दोन्ही मुलांसोबत हाँगकाँगमध्ये फिरत आहे. हाँगकाँगच्या रस्त्यावर फिरताना तिने लेकासोबत काढलेले फोटो लक्ष वेधून घेत आहेत.

नयनतारा ब्लॅक आऊटफिटमध्ये सुंदर दिसत आहे. तर तिने लेकालाही काळ्या रंगाचा शर्ट आणि ब्लू जीन्स घातली आहे. यात तिच्या लेकाची मिलियन डॉलर स्माईल पाहून चाहते फिदा आहेत.

Heart and soul असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. आजूबाजूला हाँगकाँगचा सुंदर नजारा पाहायला मिळतोय तर मध्ये नयनतारा लेकासोबत एन्जॉय करत आहे.

आणखी एका फोटोत विग्नेश सिवनही दिसत आहे. तो दुसऱ्या लेकाला सांभाळताना दिसतोय. दोन्ही मुलांना त्यांनी सारखेच कपडे घातले आहेत.

नयनताराचे साऊथ सोबतच हिंदी इंडस्ट्रीतही अनेक चाहते आहेत. 'जवान' नंतर तिला अनेक हिंदी सिनेमांच्या ऑफर मिळाल्या. मात्र आता ती आणखी कोणत्या बॉलिवूड सिनेमात झळकणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.