चार कदम चल दो ना साथ मेरे! जुळ्या मुलांचा हात धरुन अभिनेत्रीने शेअर केले खास Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 11:50 AM2024-08-24T11:50:24+5:302024-08-24T11:57:13+5:30

अभिनेत्रीच्या सुंदर फोटोंनी वेधलं लक्ष, चाहत्यांनी केला लाईक्सचा वर्षाव

साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी ही अभिनेत्री. तिला लेडी डॉन अशीही ओळख मिळाली आहे. अभिनेत्रीने कुटुंबासोबत शेअर केलेले फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

शाहरुखच्या 'जवान' सिनेमात झळकलेली साऊथ अभिनेत्री नयनतारा नेहमीच तिच्या कुटुंबासोबत फोटो शेअर करते. पती विग्नेश सिवन आणि आपल्या जुळ्या मुलांसोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

सिनेमांमध्ये काम करता करता अभिनेत्री आपल्या कुटुंबाकडेही तेवढंच लक्ष देते. नयनतारा आणि विग्नेशची जोडी साऊथ इंडस्ट्रीत लोकप्रिय आहे. शिवाय त्यांच्या जुळ्या मुलांनी चाहत्यांना प्रेमातच पाडलं आहे.

नयनतारा आणि विग्नेश सिवन यांनी 2022 साली लग्न केलं. सरोगसीच्या माध्यमातून नयनतारा जुळ्या मुलांची आई झाली. उइर आणि उलग अशी या गोंडस मुलांची नावं आहेत.

नुकतंच नयनताराने पती आणि मुलांसोबत सुंदर फोटो शेअर केलेत. दोन्ही मुलं नाईटसूटमध्ये एकदम गोड दिसत आहेत.आपल्या मुलांचा हात धरुन चालतानाचा नयनताराचा फोटो खूप सुंदर आला आहे.

तसंच पती विग्नेश सिवनसोबतही तिने फोटो शेअर केला आहे. दोघंही निळ्या रंगाच्या मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसत आहेत. हिरव्यागार वातावरणात वॉक करतानाचे या कपलचे सुंदर क्षण कॅमेऱ्यात कॅप्चर झाले आहेत.

नयनतारा लवकरच आर माधवन आणि सिद्धार्थसोबत 'टेस्ट' सिनेमात दिसणार आहे. याशिवाय 'मन्नंगट्टी सिंस 1960' मध्येही ती झळकणार आहे. तर विग्नेशचेही निर्माता म्हणून काही प्रोजेक्ट पुढील वर्षात रिलीज होणार आहेत.

नयनताराचे साऊथ सोबतच हिंदी इंडस्ट्रीतही अनेक चाहते आहेत. 'जवान' नंतर तिला अनेक हिंदी सिनेमांच्या ऑफर मिळाल्या. मात्र आता ती आणखी कोणत्या बॉलिवूड सिनेमात झळकणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.