एकाही चित्रपटात केला नाहीये मेकअप, हिट सिनेमे देऊनही साधीच राहते 'ही' अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 17:43 IST2025-03-02T17:37:20+5:302025-03-02T17:43:34+5:30
मेकअप न करता प्रचंड सुंदर दिसते ही अभिनेत्री, फोटो बघून व्हाल हैराण!

मेकअप हे स्त्रीच्या सौंदर्यात 'चार चाँद' लावतं. पण, स्त्रिया केवळ मेकअप मुळेच सुंदर दिसतात, हा समज चुकीचा आहे. फिल्म जगतात अशा अशा काही अभिनेत्री आहेत ज्या मेकअप शिवाय सुद्धा खूप सुंदर दिसतात.
अशीच एक अभिनेत्री आहे, जिचं नैसर्गिक सौंदर्यच इतके लाजवाब आहे की मेकअप न करता जरी ती समोर आली तरी तिच्या सौंदर्यावर चाहते घायाळ होतील.
विशेष म्हणजे या अभिनत्रीचा नैसर्गिक गोष्टीवर प्रचंड विश्वास आहे. आपण जसे आहोत, तसेच खूप सुंदर आहोत. त्यामुळे कुणीही कुणालाही दिसण्यावरुन कमी लेखू नये, असं तिचं मत आहे.
म्हणूनच अभिनेत्रीनं २ कोटी रुपयांच्या फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारली होती. त्यावेळी तिच्या या उपक्रमाचे खूप कौतुक झालं होतं.
आताही तुम्ही तिला ओळखलं नसेल तर ती अभिनेत्री आहे साऊथची सुंदरी साई पल्लवी (Sai Pallavi Worked In Films Without Makeup ).
साई पल्लवी ही भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी कमीतकमी मेकअपसह किंवा मेकअपशिवाय ऑन-स्क्रीन दिसते.
साई पल्लवीनं मल्याळम फिल्म 'प्रेमम' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तेव्हापासूनच तिने कधीच सिनेमात मेकअप केलेला नाही. तिचं साधं सौंदर्यंचं तरुणांच्या थेट काळजात हात घालतो.
साई पल्लवीने एका मुलाखतीमध्ये मेकअप का करत नाही याच कारण सांगितलं होतं. याबाबत ती म्हणाली होती, "मेकअपमुळे एक प्रकारचा दबाव जाणवतो. नो मेकअपमध्ये, वास्तविक व्यक्तिमत्व स्वीकारल्यामुळे मला आत्मविश्वास वाटतो".
तिचा रियल लाईफ लुक सुद्धा अत्यंत साधा असतो. ती ड्रेस वा साड्या घालण्याला अधिकाधिक प्राधान्य देते.
आपल्या सोशल मीडिया अकांउटवर ती कित्येक फोटोज विदाऊट मेकअपच शेअर करते. तिचे असे कित्येक फोटोज व्हायरल झाले आहेत, ज्यात तिने अजिबात मेकअप केलेला नाही आणि तरी ती त्यात ग्लोइंग आणि सुंदर दिसते आहे. अभिनेत्री लवकरच 'रामायण' सिनेमात रणबीर कपूरसोबत सीता मातेच्या भुमिकेत दिसणार आहे.