हिरवी साडी अन् डीप नेक ब्लाऊज; कृती शेट्टीच्या ग्लॅमरस फोटोंवरून नजर हटेना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 04:04 PM2024-09-06T16:04:24+5:302024-09-06T16:15:01+5:30

दक्षिणात्य सिनेसृष्टीत अभिनेत्री कृती शेट्टीचा मोठा चाहतावर्ग आहे. 'उप्पेना' या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.

दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

अभिनयाबरोबरच कृती तिच्या फॅशनसेन्समुळे देखील लाईमलाईटमध्ये येते.

नुकतेच कृतीने सोशल मीडियावर तिचे साडीतील खास फोटो पोस्ट केले आहेत.

हिरवी साडी त्यावर पिवळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ब्लाऊज तिने परिधान केला आहे.

या पेहरावात कृतीचं सौंदर्य खुलून आलं आहे. तिचे हे ग्लॅमरस फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

मोकळे केस, कानात झुमके तसेच साधा मेकअप करत तिने हे फोटो क्लिक केले आहेत.

कृतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अलिकडेच ती 'मनामे' या चित्रपटामुळे चर्चेत होती. ७ जूनला हा चित्रपट प्रदर्शित झाला.