कोट्यवधींची मालकीण आहे 'पुष्पा २' फेम अल्लू अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील 'श्रीवल्ली'; संपत्तीचा आकडा जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 05:09 PM2024-12-10T17:09:08+5:302024-12-10T17:18:17+5:30

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन सध्या त्याच्या 'पुष्पा-२' सिनेमामुळे चर्चेत आहे.

'पुष्पा-२' मधील अभिनेत्याने केलेल्या कामाचं सर्वस्तरातून कौतुक होतं आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाईचे नवनवीन विक्रम रचत आहे.

टॉलिवूडमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येदेखील तरुणींमध्ये अल्लू अर्जुनची कमालीची क्रेझ आहे.

दरम्यान, ६ मार्च २०११ रोजी अल्लू अर्जुनचं स्रेहा रेड्डीसोबत लग्न झालं. दोघांना अल्लू अयान व अल्लू अरहा नावाची दोन मुलं आहेत. अल्लू अर्जुनची पत्नी स्रेहा दिसायला प्रचंड सुंदर आहे.

स्नेहा रेड्डी लाइमलाइटपासून दूर राहणंच पसंत करते. पण, अल्लू अर्जूनची पत्नी स्नेहा खऱ्या आयुष्यात एक यशस्वी उद्योजिका आहे. व्यवसायाच्या माध्यमातून ती तगडी कमाई करते.

स्नेहा रेड्डी लाइमलाइटपासून दूर राहणंच पसंत करते. पण, अल्लू अर्जूनची पत्नी स्नेहा खऱ्या आयुष्यात एक यशस्वी उद्योजिका आहे. व्यवसायाच्या माध्यमातून ती तगडी कमाई करते.

अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा केंब्रिज विद्यापीठाच्या एमआईटी मधून इलेक्टॉनिक अॅंड कम्यूनिकेशन इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर तिने अमेरिकेतून कॉम्प्यूटर सायन्स या विषयात मास्टर्स पूर्ण केलं.

साधारण २०१६ मध्ये स्नेहा रेड्डीने व्यवसाय क्षेत्राकडे पाऊले वळवली. हैदराबाद येथील एका उच्चभ्रू वस्तीत 'Picaboo' नावाचं फोटो स्टूडिओ सुरू केलं. 'Picaboo' हा स्टूडिओ प्रोफेशनल फोटोग्राफिसाठी ओळखला जातो.

मीडियारिपोर्टनुसार स्नेहा रेड्डी या स्टूडिओच्या माध्यमातून चांगली कमाई करते. शिवाय तिची एकूण संपत्ती ४२ कोटी इतकी आहे.