नादच खुळा... 'या' अभिनेत्यानं एकाच वर्षात दिले 25 हिट सिनेमे! बुर्ज खलिफात आहे फ्लॅट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 05:05 PM2024-08-22T17:05:07+5:302024-08-22T17:22:42+5:30

या सुपरस्टारचा दर 15 दिवसांनी सिनेमा रिलीज व्हायचा.

एक असा अभिनेता आहे, ज्याने एकाच वर्षात दिले 25 हिट सिनेमे दिले होते. या सुपरस्टारचा दर 15 दिवसांनी सिनेमा रिलीज व्हायचा.

ते आहेत सुपरस्टार मोहनलाल (superstar Mohanlal). मोहनलाल यांचे केवळ मल्याळमच नव्हे तर जगभरात चाहते आहेत.

मोहनलाल यांना 5 वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि 9 वेळा राज्य पुरस्कार, पद्मभूषण आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलेलं आहे.

मोहनलाल हे अतिशय प्रतिभावान अभिनेते आहेत. त्यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अभिनयासोबतच ते गायनही करतात. एवढंच नाही तर ते एक राज्यस्तरीय कुस्ती चॅम्पियनही राहिले आहेत.

मोहनलाल यांनी वयाच्या ६ व्या वर्षी एका वृद्धाची भूमिका साकारली होती. डीएनए इंडियाच्या रिपोर्टनुसार, मोहनलाल यांना लहानपणापासूनच नाटकांमध्ये काम करायला आवडायचं. सहावीत असताना त्यांनी एका नाटकात भाग घेतला आणि वृद्धाची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेसाठी मोहनलाल यांची खूप प्रशंसा झाली होती.

मोहनलाल यांनी 1978 मध्ये पहिल्यांदा 'थिरनोत्तम' चित्रपटात काम केले होते. पण, त्यांचा पहिलाच चित्रपट 25 वर्षे रखडला होता. यामुळे मोहनलाल खूपच निराश झाले होते. पण नंतर त्यांनी 'मंजिल विरांजा पोक्का' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी खलनायकाच्या भूमिकेला खूप पसंत केले गेले.

मोहनलाल हळूहळू यशाच्या पायऱ्या चढत गेले. 1982 ते 1986 पर्यंत परिस्थिती अशी होती की त्यांचे चित्रपट दर 15 दिवसांनी प्रदर्शित होऊ लागले. एका वर्षात त्यांनी 34 चित्रपटांमध्ये काम केलं होतं आणि सलग 25 हिट चित्रपट दिले आहेत. मोहनलाल यांचा हा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही.

फक्त बोलायला सुपरस्टार नव्हे तर त्याची लाइफस्टाइलही तशीच आहे. त्याच्या संपत्तीचा आकडा वाढतंच चालला आहे. दुबईतील बुर्ज खलिफामध्ये मोहनलाल यांचा एक फ्लॅट आहे. २०११ मध्ये त्यांनी हा फ्लॅट खरेदी केला होता.

मोहलाल यांच्याकडे मर्सिडीज बेंज, बीएमडब्ल्यू, जॅग्वार आणि रेंज रोवर यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. चित्रपट निर्मिती आणि वितरणाशिवाय त्यांचा मसाला पॅकेजिंग आणि रेस्टॅरंटचाही व्यवसाय आहे.