३ वेळा मोडलं लग्न, आता चौथ्यांदा ही अभिनेत्री थाटणार संसार?, समोर आलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 12:57 PM2024-10-06T12:57:32+5:302024-10-06T13:04:15+5:30

अभिनेत्रीने सोशल मीडियावर लग्न करत असल्याचे जाहीर केले होते. आता यामागचं सत्य समोर आलं आहे.

प्रसिद्ध तमीळ अभिनेत्री वनिता विजयकुमार मागील काही दिवसांपासून तिच्या चौथ्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.

खरेतर अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी गुडघ्यावर बसून कोरिओग्राफर रॉबर्टला प्रपोझ करतानाचा फोटो शेअर केला होता आणि लग्नाची घोषणा केली होती.

अभिनेत्रीने तिच्या लग्नाची जाहीर केली होती. तिने पोस्टमध्ये सांगितले होते की, तिचे लग्न ५ ऑक्टोबरला आहे.

वनिता विजयकुमार लग्नाबद्दल सांगितल्यानंतर अनेकांनी शुभेच्छा दिल्या. तर काहींनी तिला चौथ्या लग्नावरून ट्रोल केले होते.

मात्र आता नवीन माहितीनुसार वनिता आणि रॉबर्ट लग्न करत नाहीत. अभिनेत्रीने रॉबर्टसोबतच्या लग्नाच्या प्रपोझलचा जो फोटो शेअर केला होता, तो तिच्या आगामी प्रोजेक्टचा प्रोमो होता.

फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, वनिता आणि रॉबर्टने त्यांचा प्रोजेक्ट अशारितीन प्रमोट केला होता, जे पाहून त्यांनी लग्नाची घोषणा केल्याचे वाटत होते.

आता त्या दोघांनी जाहीर केले की, ते दोघे मिसेस अँड मिस्टरमध्ये झळकणार आहेत आणि हा फोटो या चित्रपटाच्या शूटिंगचा होता.

अभिनेत्रीला तिच्या नव्या चित्रपटासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत. तर काहींचे म्हणणे आहे की, त्यांना आधीपासूनच माहित होते.

वनिता विजयकुमार तमीळ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने २००० साली अभिनेता आकाशसोबत लग्न केले होते. या लग्नापासून तिला दोन मुले आहेत. मात्र २००५ साली दोघांचं घटस्फोट झाला.

पहिले लग्न तुटल्यानंतर वनिताने बिझनेसमन जय राजनसोबत २००७ साली दुसरे लग्न केले होते. या लग्नापासून तिला एक मुलगी आहे. मात्र २०१२ साली ते दोघे वेगळे झाले होते.

यानंतर २०२०मध्ये अभिनेत्रीने तिसरे लग्न केले होते. मात्र लग्नाच्या काही महिन्यातच हे लग्नही मोडले.