१३७० कोटींचा मालक आहे 'हा' अभिनेता, जिथे कुठे प्रवास करतो, तिथे तो एक कुकर घेऊन जातो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:26 IST2025-04-10T18:13:23+5:302025-04-10T18:26:21+5:30

अभिनेता जिथे कुठे प्रवास करतो, तिथे कुकर घेऊन जातो, कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

आपल्या लाडक्या स्टार्सविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. ते कुठे राहतात, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत याविषयी चाहत्यांना फार उत्सुकता असते. त्या आज आम्ही तुम्हाला अशाच स्टारबद्दल एक खास गोष्ट सांगणार आहोत, हे वाचल्यावर तुम्हाला त्या अभिनेत्याचं कौतुक वाटेल.

त्याचं फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्येच नाही तर उद्योजक जगतातही मोठं नाव आहे. तब्बल १३७० कोटींचा मालक असलेला हा अभिनेता मातीशी नाळ जोडून आहे.

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हा अभिनेता जगात कुठेही गेला तरी तो आपल्यासोबत एक कुकर घेऊन जातो. स्वत: अभिनेत्याचं पत्नीनं याचा खुलासा केला आहे.

हा दुसरा तिसरा कोणी नसून दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण तेजा (Ramcharan Teja).

आजकाल असा कोणताही पदार्थ नाही जो कोणत्याही देशात मिळत नाही. परदेशातही अनेक भारतीय रेस्टॉरंट्स आहेत. त्यामुळे, परदेशात राहूनही तुम्ही भारतीय जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. पण, राम चरणला घरी बनलेलं खायला आवडतं.

राम चरणची पत्नी उपासना (Ram Charan Wife Upasana Kamineni Konidela) हिने नुकतीच Masoom Minawala ला दिलेल्या यूट्यूब चॅनलवर याचा खुलासा केला आहे. उपासना म्हणाली, "रामला रोज एक वेळचं जेवण घरगुती भारतीय हवंच असतं, मग तो जगात कुठेही असो. त्यामुळे आम्ही प्रवासात एक कुकर आणि खास मसाले घेऊन फिरतो".

उपासना म्हणाली की, "आजकाल अनेकांना घरी बनवलेले अन्न हवे असते. कारण एका विशिष्ट टप्प्यानंतर लोक बाहेरचे अन्न खाऊ शकत नाहीत. राम चरणसाठी ते फक्त जेवण नाही, तर घराशी जोडलेलं एक भावनिक नातं आहे. बाहेरच्या चमकदार जीवनातही तो घरगुती चव आणि आपुलकी शोधतो"

राम चरणच्या आई, सुरेखा कोनिडेला स्वतः रेडीमेड फूड पॅकेट बनवतात. याला 'अथम्माचे स्वयंपाकघर' असं कौटुंबिक नाव दिलं गेलं आहे. हे सर्व मिश्रण ताजं असतं आणि घरगुती पद्धतीने तयार केलेलं असतं. उपासना म्हणाली, "आम्ही कुठेही गेलो तर नेहमी सोबत कुकर ठेवतो. अगदी पाण्याखाली ते कुकर ठेवून प्लग इन करतो, जेणेकरून फायर अलार्म वाजणार नाही आणि आम्हाला घरी बनवलेलं जेवणही करता येईल".

राम चरणची आई सुरेखा या त्यांचे पती चिरंजीवी यांच्यासाठी खास अन्नाचे पॅकेट बनवायच्या. पण, आता त्या राम चरणसाठी बनवतात, असं उपासना हिने सांगितलं.

राम चरणच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याचा अलिकडेच 'गेम चेंजर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण, या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. आता लवकर तो 'पेड्डी' या चित्रपटात दिसणार आहे.