"क्या खूब लगती हों..." 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील शालिनीचा मनमोहक लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 03:57 PM2024-08-29T15:57:19+5:302024-08-29T16:08:22+5:30

टीव्हीवरील लोकप्रिय खलनायिकेचा चेहरा अशी अभिनेत्री माधवी निमकरची ओळख आहे.

वेगवेगळ्या मालिकांमध्ये साकारलेल्या खलनायिकी भूमिकांमुळे माधवी प्रसिद्धीझोतात आली.

सध्या अभिनेत्री माधवी निमकर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत 'शालिनी' नावाची भूमिका साकारत आहे.

अभिनयाबरोबरच माधवीच्या फिटनेस आणि सौंदर्याचीही चर्चा होते.

सोशल मीडियावर अभिनेत्रीची तगडी फॅन फॉलोइंग पाहायला आहे.

नुकतेच तिने सोशल मीडियावर डिझायनर टिश्यू सिल्क साडी नेसून फोटो पोस्ट केले आहेत.

'स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४' या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिने हा खास लूक केला आहे.

अभिनेत्रीच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. माधवीचा मनमोहक लूक पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.