आजीची साडी अन् मराठमोळा ठसका! अक्षया नाईकच्या पारंपरिक लूकने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 12:06 IST2024-05-29T11:55:50+5:302024-05-29T12:06:08+5:30
'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईकचं साडीत फोटोशूट, अभिनेत्रीचे फोटो एकदा पाहाच

अक्षया नाईक ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. नवीन प्रोजेक्टची माहिती ती पोस्टद्वारे चाहत्यांना देत असते.
नुकतेच अक्षयाने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील काही फोटो पोस्ट केले आहेत.
अक्षयाने आजीची साडी नेसून खास लूक केला आहे. निळ्या रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य खुलून आलं आहे.
या साडीवर अक्षयाने मोत्याचे दागिने घालत मराठमोळा लूक केल्याचं दिसत आहे.
अक्षयाचे हे पारंपरिक वेशातील फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अक्षयाने मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत ती दिसली होती.
याशिवाय 'सावधान इंडिया', 'बिग एफ', 'मेरे रंग में रंगने वाली' या मालिकांमध्येही तिने काम केलं आहे.