सनीच्या 'गदर २' ने मोडला पठाणचा रेकॉर्ड; चित्रपटाला धमाकेदार ओपनिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 02:29 PM2023-08-09T14:29:28+5:302023-08-09T14:57:41+5:30

बॉलिवूडमधील ब्लॉकबस्टर राहिलेल्या सनी देओलच्या गदर चित्रपटाचा सिक्वल गदर २ ११ ऑगस्ट रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. प्रेक्षकांनाही या चित्रपटाची मोठी उत्सुकता आहे. त्यामुळेच, चित्रपटाच्या फर्स्ट डे च्या शोचं बुकींग सध्या जोरात सुरू आहे.

बॉलिवूडमधील ब्लॉकबस्टर राहिलेल्या सनी देओलच्या गदर चित्रपटाचा सिक्वल गदर २ ११ ऑगस्ट रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. प्रेक्षकांनाही या चित्रपटाची मोठी उत्सुकता आहे. त्यामुळेच, चित्रपटाच्या फर्स्ट डे च्या शोचं बुकींग सध्या जोरात सुरू आहे.

सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर चित्रपटाने बॉलिवूडमध्ये इतिहास घडवला होता. आता, पुन्हा एकदा गदर २ च्या माध्यमातून इतिहास घडवण्यास हा चित्रपट सज्ज झाला आहे.

अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट एडव्हान्स बुकींगचेही रेकॉर्ड बनवत आहे. चित्रपटाने शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचा रेकॉर्ड तोडला असून एडव्हान्स बुकींगमध्ये आगेकूच केलीय.

एडव्हान्स बुकींगमध्ये टीयर बी आणि सी शहरातील सिंगल स्क्रीनवर शाहरुख खानच्या पठाणला मागे टाकलं आहे. बॉक्स ऑफिसची माहिती देणाऱ्या तरण आदर्श यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

एडव्हान्स बुकींगमध्ये गदर २ चित्रपटाची मोठी विक्री झालीय. सुरुवातीच्या काही दिवसांसाठी चित्रपटाचे ७६००० बुकींग झालं आहे.

एकट्या पीव्हीआर सिनेमागृहात गदर २ चित्रपटाचे ३३ हजार तिकीटांचे बुकींग आहे. तर, आयनॉक्स आणि सिनेपोलीसने ११ ऑगस्ट रोजीचे अनुक्रमे २५,५०० आणि १८,१०० तिकीटांची विक्रीय केलीय.

या सिनेमागृहांतील एका दिवसासाठी झालेलं एकूण बुकींग ७६,६०० एवढं आहे. त्यामुळे, आत्तापर्यंत गदर २ चित्रपटाचे १ लाखापेक्षा अधिक तिकीट विकले गेल्याचा अंदाज आहे.

पठाण चित्रपटाला मागे टाकत या वर्षातील सर्वाधिक ओपनिंग कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरणार आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचा मोठा आकडा गाठू शकते.

पहिल्या दिवशी २० कोटी रुपयांपेक्षा अधिक ओपिनिंग चित्रपटाच्या माध्यमातून होईल, असा चित्रपट उद्योगतज्ज्ञांचा अंदाज आहे. कारण, मेट्रो शहरांतूनही चित्रपटाला उदंड प्रतिसाद आहे.

दरम्यान, गदर २ चित्रपटाला अक्षय कुमारच्या ओएमजी २ चित्रपटाचा सामना करावा लागणार आहे. दोन्ही चित्रपट सिक्वेल आहेत, त्यामुळे दोन्हीसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.