धक्कादायक! सुशांतला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवणार होती रिया, ब्लॅकमेलही करत होती! By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 03:07 PM 2020-08-06T15:07:25+5:30 2020-08-06T15:39:35+5:30
रियाच्या कॉल्स डिेटेल्सनुसार, जेव्हा सुशांत २० ते २४ जानेवारी २०२० दरम्यान त्याची बहीण राणीला भेटण्यासाठी चंडीगढ गेला होता. तेव्हा रियाने त्याला ५ दिवसात जवळपास २५ कॉल्स केले होते. सुशांत सिंह राजपूत केसचा गुंता दिवसेंदिवस वाढत आहे. सुशांतचा मृत्यू होऊन एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला. पण अजूनही त्याने आत्महत्या का केली यावरून पडदा उठलेला नाही.
सुशांत सिंह राजपूत केसमध्ये रोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. या केसमध्ये सर्वांची नजर रिया चक्रवर्तीवर आहे. वेगवेगळ्या गोष्टींसोबत आता रियाच्या कॉल डिटेल्सचाही खुलासा झाला आहे. यातून अशी माहिती समोर आली आहे. जी संशयास्पद आहे.
रियाच्या कॉल्स डिेटेल्सनुसार, जेव्हा सुशांत २० ते २४ जानेवारी २०२० दरम्या त्याची बहीण राणीला भेटण्यासाठी चंडीगढ गेला होता. तेव्हा रियाने त्याला ५ दिवसात जवळपास २५ कॉल्स केले होते.
आजतकला त्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतने नोव्हेंबरमध्ये बहिणीला मदत मागण्यासाठी कॉल केला होता आणि चंडीगढला जाण्यासाठी त्याने तीन बहिणींसोबत तिकीटही बुक केलं होतं. पण रियाने त्याला ब्लॅकमेल केलं आणि जाण्यास मनाई केली.
नंतर डिसेंबरमध्ये सुशांतने नवीन नंबरवरून कॉल करून बहिणीला मदत मागितली होती. सुशांतच्या बहिणीने आरोप केला होता की, रिया आणि तिच्या परिवारातील लोक त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करत होते. त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये जायचं नव्हतं. त्याला मुंबईतील सगळं काही सोडून हिमाचलमध्ये सेटल व्हायचं आहे.
त्यानंतर तो गाडीने चंडीगढला गेला. त्याने गाडी स्वत: चालवली. तिथे तो २ दिवस थांबला. अशात सिद्धार्थ पिठानीने रियाला सुशांत चंडीगढला आल्याचे सांगितले. त्यानंतर रियाने त्याला परत येण्यासाठी ब्लॅकमेल केलं आणि ३-४ दिवसात २५ वेळा कॉल केला.
दरम्यान सुशांत केसमध्ये ईडीने रिया चक्रवर्तीला समन पाठवला आहे. तर खार येथील तिच्या प्लॅटवर ईडीचं लक्ष आहे. असं मानलं जात आहे की, खारमधील हे घर तिच्या नावावर आहे.
रिया चक्रवर्तीला ७ ऑगस्टलला आपलं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी बोलवलं आहे. तिचा भाऊ शोविक जो सुशांतसोबत दोन कंपन्यांमध्ये डायरेक्टर होता. त्यालाही जबाब नोंदवण्यासाठी पुढील आठवड्यात बोलवलं जाऊ शकतं.
रियाचा चार्टर्ड अकाउंटट रितेश शाह यालाही जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं आहे. याआधी ईडीने सुशांतच्या सीएला बोलवून ११ तास विचारपूस केली होती.