स्ट्रगलिंग काळात असा दिसायचा सुशांत सिंग राजपूत, फक्त २५० रुपये होती पहिली कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 03:54 PM2022-06-14T15:54:23+5:302022-06-14T16:11:14+5:30

Sushant Singh Rajput : सुशांत सिंग राजपूतने त्याच्या जीवनात खूप संघर्ष केला होता. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर टेलिव्हिजनच्या दुनियेत स्थान निर्माण केले आहे आणि नंतर चित्रपटांमध्येही तो हिट झाला. यशाचा शिखरावर असतानाच त्याने जगाचा निरोप घेतला.

आज सुशांत सिंग राजपूतची पुण्यतिथी आहे. त्याने 14 जून रोजी आत्महत्या केली. त्याला सिनेइंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. मात्र त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला.

सुशांतचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण पाटणा येथील सेंट केरेन्स हायस्कूलमधून झाले.

सुशांतने दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. या दरम्यान सुशांतला वाटले की त्याने काही एक्स्ट्रा अॅक्टिव्हिटी करावी. नंतर सुशांतने अभियांत्रिकीचे शिक्षण सोडले आणि कोरिओग्राफर श्यामक दावर यांच्या डान्स ग्रुपमध्ये सामील झाला. त्याची पहिली कमाई फक्त 250 रुपये होती, असे सांगितले जाते.

मुंबईत अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर, सुशांतला 2008 मध्ये बालाजी टेलिफिल्म्सच्या शो 'किस देश में है मेरा दिल' मधून टीव्हीवर पहिला ब्रेक मिळाला. 2009 मध्ये 'पवित्र रिश्ता' हा टीव्ही शो पाहायला मिळाला आणि तेव्हापासून अभिनेत्याचे नशीब फळफळले.

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या प्रेमाची बरीच चर्चा झाली होती. पण नंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

सुशांत सिंग राजपूतने 2011 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेला अलविदा केला होता आणि त्यानंतर 2013 मध्ये तो थेट 'काई पो छे' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटातून त्याला ओळखही मिळाली.

सुशांतचे फिल्मी करिअर खूप हिट ठरत होते. त्याचे एमएस धोनी, छिछोरे सारखे चित्रपट खूप हिट झाले होते आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झालेला त्याचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा देखील लोकांना खूप आवडला होता.