४५ वा वाढदिवस साजरा करते सुश्मिता सेन, वयाच्या २५ वर्षी रिन्नीला दत्तक घेत बनली होती आई By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 02:12 PM 2020-11-19T14:12:29+5:30 2020-11-19T14:18:29+5:30
बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन 19 नोव्हेंबरला आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. हैदराबादमधील वैद्यब्रह्मण कुटुंबात जन्मलेल्या सुष्मिताचे वडील भारतीय हवाई दलात विंग कमांडर होते आणि तिची आई दुबईतील एका स्टोअरमध्ये ज्वेलरी डिझायनर होती. सुष्मिताने केवळ अभिनय क्षेत्रातच नाव कमावले नाही तर त्याचवेळी ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही सर्वच स्थरांवरून कौतुकास पात्र ठरते. सुश्मिताने सिंगल पॅरेंट बनून सर्वांना चकित केले होते. रिनी आणि अलीशा नावाच्या दोन मुलींना दत्तक घेतले आहे.
सुश्मितान एका मुलाखतीत सांगितले होते की तिने स्वतः रिन्नीला सांगितले की आपण तिला दत्तक घेतले आहे.
तिने ही गोष्ट एका गेमच्या माध्यमातून रिन्नीला सांगितल्याचे सुश्मिताने सांगितले होते.
सुश्मिताने 2000 मध्ये रिन्नी आणि 2010 मध्ये अलिशा या दोघींना दत्तक घेतले होते.
जेव्हा रिन्नीला तिने दत्तक मुलगी असल्याचे सांगितले होते. तेव्हा रिन्नी 25 वर्षांची झाली होती.
रिन्नी जेव्हा 18 वर्षांची होईल तेव्हाच तिच्या पालकांबद्दल माहिती देऊ शकेल असे कार्टाकडूनच सांगण्यात आले होते.
जास्त दिवस रिन्नीपासून काही लपवून न ठेवता सत्य तिला सांगितले असल्याचे सुश्मिताने सांगितले होते.
चुकीची माहिती देवून मला रिन्नीला दुखवायचे नव्हते.
त्यामुळे रिन्नीला तिच्या पालकांना जेव्हा कधी भेटायचे असेल तेव्हा नक्कीच आम्ही भेटू.
जेव्हा कधी तुला तुझ्या ख-या आई-वडिलांना भेटायचे असेल तेव्हा मी तुला त्यांच्याकडे घेऊन जाईन असा विश्वास तिने रिन्नीला दिला होता.