TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील बापुजींची बायको आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 03:53 PM2022-01-06T15:53:41+5:302022-01-06T16:03:43+5:30

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : मालिकेत वृद्ध बापूजींची भूमिका साकारणारा अमित भट ख-या आयुष्यात फक्त 47 वर्षांचा आहे आणि रिअल लाईफमध्ये खूपच रोमॅन्टिकही आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करतेय. मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. जेठालाल आणि चंपकलाल या पितापुत्रांची जोडी तर कमालीची लोकप्रिय आहे.

आज आम्ही बापूजी अर्थात चंपकलाल यांच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. होय, बापूची भूमिका अमित भट याने साकारली आहे.

मालिकेत वृद्ध बापूजींची भूमिका साकारणारा अमित भट ख-या आयुष्यात फक्त 47 वर्षांचा आहे आणि रिअल लाईफमध्ये खूपच रोमॅन्टिकही आहे.

रिअल लाईफमध्ये अमितला दोन मुलं असून त्याची बायकोही खूप सुंदर आहे. त्याच्या पत्नीचे नाव कृती भट्ट आहे.

अमितची बायको कृती ती खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. अमित भट अनेकदा पत्नी आणि मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.

अमितला प्रवासाची खूप आवड आहे आणि त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते कुटुंबासोबत फिरायला जातात.

अमित हा गुजराती रंगभूमीवरचा प्रसिद्ध अभिनेता असून त्याने अनेक गुजराती नाटकांमध्ये काम केले आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ या मालिकेमुळे अमितला खºया अर्थाने लोकप्रियता मिळाली.

या मालिकेसाठी मेकअप करायला अमितला अनेक तास लागतात. अमित बापूजीची भूमिका इतकी अफलातून साकारतो की, लोक त्याच्या प्रेमात पडतात.

कृती तारक मेहता का उल्टा चष्माच्या सेटवर येत असते आणि तिचे या मालिकेतील सर्व कलाकारांसोबत चांगले संबंध आहे. तसेच तिचे महिला मंडळींसोबत खूप चांगली मैत्री आहे.